आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • NCB May Send Summons To Sara Khan Angad Hasija After Sanam Abigail, Angad Explains 'I Have Nothing To Do With This'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही इंडस्ट्रीतील ड्रग्ज प्रकरण:सनम-अबिगेलनंतर सारा खान-अंगद हसीजाला एनसीबी पाठवू शकते समन, स्पष्टीकरण देताना अंगद म्हणाला - 'माझा याच्याशी काहीही संबंध नाही'

किरण जैन, मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दोघांची नावे अबिगेल हिने चौकशीदरम्यान एनसीबाला दिली आहेत.

कोरिओग्राफर-अभिनेता सनम जोहर आणि त्याची प्रेयसी अबिगेल पांडे यांची एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो) ड्रग्ज प्रकरणात चौकशी केली आहे. राहिल आणि अनुज केशवानी या ड्रग पेडलर्सच्या चौकशीतून या दोघांची नावे समोर आली आहेत. असे मानले जाते की, बॉलिवूडनंतर आता टीव्ही इंडस्ट्रीमध्येही यामुळे मोठी खळबळ माजली आहे. आगामी काळात, आणखी आठ नावे समोर येऊ शकतात, यामध्ये काही ए ग्रेड आणि बी ग्रेड टीव्ही स्टार्सचा समावेश आहे.

आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात टीव्ही अभिनेत्री सारा खान हिचेदेखील नाव असण्याची शक्यता आहे. ती या इंडस्ट्रीत जवळपास 15 वर्षांपासून कार्यरत आहे. ती केवळ टीव्ही शोज नव्हे तर रिअॅलिटी शो आणि काही वेब सीरिजचादेखील एक भाग आहे. आपले वैयक्तिक आयुष्य आणि बोल्डनेसमुळे ती अनेकदा वादात सापडली आहे. सारासोबतच तिचा जवळचा मित्र अंगद हसीजादेखील या प्रकरणात अडकू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोघांची नावे अबिगेल हिने चौकशीदरम्यान एनसीबाला दिली आहेत.

  • अंगद हसीजाने ड्रग्ज प्रकरणाशी संबंध असल्याचे नाकारले

दैनिक भास्करशी झालेल्या चर्चेदरम्यान अंगदने ड्रग्ज प्रकरणात त्याचा काहीही संबंध असल्याचे नाकारले आहे. अंगद म्हणाला, "या प्रकरणात माझे नाव पुढे आले आहे हे ऐकून मला धक्का बसला आहे. यात काहीच सत्य नाही आणि मला त्याबद्दल काहीही माहित नाही. आता तर स्पष्ट आहे की, प्रत्येकाविषयी काहीही बोलले जाईल. जिथे दीपिका (पदुकोण) आणि इतरांबद्दल बोलले जात आहे, तिथे कदाचित आणखी नावे यात जोडली जातील. मला याबद्दल कल्पना नाही आणि या प्रकरणाशी माझा काडीमात्रही संबंध नाही." आम्ही सारा खानशीही बोलण्याचा प्रयत्न केला पण तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

  • डान्स कोरिओग्राफर्समध्ये भीतीचे वातावरण

सूत्रांच्या मते, इंडस्ट्रीत डान्सर्स आणि कोरिओग्राफर्स यांचे अमली पदार्थ घेणे ही सामान्य बाब आहे. यामागील एकमेव कारण म्हणजे फक्त एनर्जी कायम राखणे. न थकता परफॉर्म करता यावे यासाठी अनेक डान्सर्स याचे सेवन करतात. सनम आणि अबिगेल यांची नावे समोर आल्यानंतर अनेक नामवंत कोरिओग्राफर्समध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एनसीबीने काल अबिगेल आणि सनम यांच्या जुहूस्थित घरावर छापा टाकला. या कारवाईनंतर दोघांनाही चौकशीसाठी एनसीबीच्या अधिका-यांनी ऑफिसमध्ये बोलावले. या घटनेनंतर दैनिक भास्करने या कपलच्या जवळच्या मित्रांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र सध्या सर्वजण याविषयावर बोलणे टाळत आहेत.

  • सनम जोहरचे ड्रग्ज कनेक्शन नाव ऐकून मधुरिमा तुली हैराण

अबिगेलची जवळची मैत्रीण आश्का गोराडिया यांनी स्वत:ला बिझी असल्याचे कारण देत आमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला, दुसरीकडे, 'नच बलिये 8' मध्ये सनम जोहरसोबत काम केलेल्या मधुरिमा तुली हिनेदेखील बोलणे टाळण्याचा प्रयत्न केला. मधुरिमा म्हणाली, "हे पहा, मला यावर आता कोणत्याही प्रकारे भाष्य करण्याची इच्छा नाही. मी एवढेच सांगू शकते की सनम आणि अबिगेलबद्दल वाचून मला खूपच धक्का बसला आहे, पण मला खात्री आहे की ते लवकरच यातून बाहेर पडतील."

बातम्या आणखी आहेत...