आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन परीक्षक:लॉकडाऊननंतर ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’मध्ये उदीत नारायण-कुमार सानू ऐवजी आता हिमेश रेशमिया-जावेद अली दिसणार परीक्षकाच्या खुर्चीत

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊन हळूहळू उठत चालला असून देशभरातील लोक आता ‘नवीन नॉर्मल’ मध्ये प्रवेश करू लागले आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’सुद्धा आपल्या प्रेक्षकांसोबत पुन्हा कनेक्ट होण्यासाठी सज्ज आहे. ‘न्यू नॉर्मल’ या नवीन काळात प्रेक्षकांसाठी आता एक नवीन सरप्राईज वाट पाहत आहे, ज्यात लोकप्रिय गायक हिमेश रेशमिया आणि जावेद अली हे अलका याग्निक यांच्यासोबत ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ 8 व्या सीजनसाठी मेंटॉर्स म्हणून असतील. 

प्रसिद्ध गायक उदित नारायण आणि कुमार सानू हे लॉकडाऊनपूर्वी या शोचा हिस्सा होते, पण वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी या शोच्या बाहेर पडण्याचे ठरवले. आता जावेद अली आणि हिमेश रेशमिया हे या शो मध्ये पुनरागमन करत आहे.  जावेद अली आणि हिमेश रेशमिया हे सा रे ग म प च्या संस्कृतीचा अनेक वर्षे भाग राहिलेले आहेत. 2017 मध्ये 8 महिने एवढा सर्वाधिक काळ सुरू असलेल्या सीझन आणि प्रथम क्रमांकाचा टॅलेंट बेस रिअॅलिटी शो लिटल चॅम्प्सचा हे दोघे हिस्सा होते. 2 वर्षानंतर आता पुन्हा एकदा झी टीव्हीवर अलका याग्निक यांच्यासोबत हे दिसणार आहेत.  

लिटल चॅम्प्ससोबत पुन्हा एकदा काम करण्याबद्दल जावेद अली म्हणाले, “या शोचा हिस्सा बनताना पुन्हा एकदा खूप छान वाटतंय. हे मला माझ्या घरी परत येण्यासारखे आहे. 2011 साली मी या फ्रँचाइजमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिले. सा रे ग म प 2012 चे सूत्रसंचालनही मी केले आणि मग 2017 झाली सर्वाधिक काळ चालणाऱ्या ऐतिहासिक सीझनचे परीक्षणही केले, त्यामुळे या शो सोबत माझ्या खूप छान आठवणी आहेत. लॉकडाऊनच्या आधी या शोचे परीक्षण करणाऱ्या दिग्गज गायकांची जागा मी कदाचित भरून काढू शकणार नाही, पण या शोचे परीक्षण मी माझ्या स्टाईलने करेल. लहान मुलांप्रती मी खूपच हळवा असून त्यांच्या भावनांची काळजी घेऊन आम्ही शो पुढे नेऊ. अलकाजी, हिमेश आणि माझे चांगले जमते आणि आम्ही नक्कीच खूप मजा करू. मला माहिती आहे की चित्रीकरण नॉर्मल असणार नाही आणि आम्हा सर्वांसाठी एक वेगळा अनुभव असेल पण तरीही मला असं वाटतं या शोमधील लहान मुले आणि सर्वच सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी सगळेजण वचनबद्ध आहेत. यावेळी या लहान मुलांच्या सादरीकरणाचे आम्ही व्हर्च्युअल मिठ्या मारून कौतुक करू, कारण आम्ही त्यांना स्पर्श करू शकत नाही.”

मेंटॉर हिमेश रेशमिया म्हणाले, “झी टीव्हीसोबत मी आता दोन दशकाहूनही अधिक काळापासून काम करत असून हद्दीत सा रे ग म प च्या सिल्वर जुबली सेलिब्रेशन मध्येही मी सामील होतो या शोमध्ये मी अनेकदा मेंटॉर राहिलो आहे आणि ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ मध्ये हे येणे हे माझ्यासाठी घरी परत येण्यासारखे आहे. 2017 साली लिटल चॅम्पच्या अतिशय यशस्वी आणि आणि आठ महिन्यांच्या रेकॉर्डसह ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’चा सीझन अतिशय यशस्वी राहिला आणि त्या वर्षीचा टॉप रेटेड सिंगिंग रिअॅलिटी शो बनला.  या शोमध्ये नव्या दमाने सुरुवात करण्यासाठी मी उत्सुक आहे आणि आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो.”

सेटवरील शो प्रोडक्शनच्या न्यू नॉर्मल बद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “सध्याची परिस्थिती लक्षात घेता या लहान मुलांची सुरक्षितता आमची सर्वोच्च प्राथमिकता असून अख्या क्रू तर्फे मार्गदर्शक सूचना पाळण्यात येत आहेत. एक मेंटॉर म्हणून या मुलांच्या आकांक्षा, स्वप्ने आणि आशा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या कलेमध्ये वाढ होईल असे पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”

बातम्या आणखी आहेत...