आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन बिजलानीने 4 ऑक्टोबर रोजी पत्नी नेहा स्वामीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. नेहाला संसर्ग झाल्यानंतर ती घरीच क्वारंटाइन असल्याचे त्याने सांगितले होते. पत्नीची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अर्जुनने त्याची आणि मुलीची रॅपिड टेस्ट करुन घेतली होती. या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर अर्जुनने रॅपिड अँटिजेन टेस्टदेखील करुन घेतली. यात त्याचा मुलगा आयानची टेस्ट पॉझिटिव्ह आली.
आयान आई नेहासोबत क्वारंटाइनमध्ये आहे
पत्नी नेहाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ती घरीच क्वारंटाइनमध्ये आहे. तर आता आयानदेखील तिच्यासोबत आहे. याविषयी अर्जुनने लिहिले, 'ज्या क्षणाची मला सर्वात जास्त भीती वाटली, दुर्दैवाने तेच घडले. माझा मुलगा आयान कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्याची रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र डिटेल पीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आयान माझ्या पत्नीसोबत आता क्वारंटाइनमध्ये आहे. माझ्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. आशा करतो की, टेस्ट निगेटिव्हच राहावी, कारण दूर राहूनच का होईना ते कुटुंबाची काळजी घेण्यासाठी गरजेचे आहे,' असे अर्जुन म्हणाला.
View this post on InstagramKeep us in yours prayers ... !!!
A post shared by Arjun Bijlani (@arjunbijlani) on Oct 6, 2020 at 11:56pm PDT
मी आणि माझे कुटुंबीय पुढचे 14 दिवस क्वारंटाइनमध्ये राहणार आहे. तसेच आमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कृपया कोरोना चाचणी करुन घ्या आणि आमच्यासाठी प्रार्थना करा, असेही अर्जुन म्हणाला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.