आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खिलाडीचे नवे अ‍ॅडव्हेंचर:या दिवशी प्रदर्शित होणार अक्षयचा ‘Into The Wild’ मधील एपिसोड, प्रोमो शेअर करुन सांगितले बेअरने पाजला होता हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेला चहा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षयने या शोचा प्रोमोदेखील शेअर केला आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार लवकरच मॅन व्हर्सेस वाइल्ड स्टार बेअर ग्रिल्ससोबत एका नवीन शोमध्ये दिसणार आहे. डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित होणा-या या कार्यक्रमाचे नाव आहे 'इन टू द वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स'. अक्षयने ट्विटरवरुन ही माहिती दिली. त्याने या शोचा प्रोमोदेखील शेअर केला आहे.

  • अक्षय कुमारला बसला होता धक्का

अक्षयनेही प्रोमो शेअर करुन एक धक्का देणारी गोष्टदेखील सांगितली आहे. मी यापूर्वी बर्‍याच आव्हानांची कल्पना केली होती. पण हत्तीच्या विष्ठेपासून बनवलेल्या चहाने बेअर ग्रेल्सने मला चकित केले, असे अक्षय म्हणाला. अक्षय आणि बिअर यांच्या अ‍ॅडव्हेंचरने परिपूर्ण असा हा कार्यक्रम येत्या 11 आणि 14 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता हा प्रसारित होणार आहे.

  • हा शो 50 देशांमध्ये 7 भाषांमध्ये प्रसारित होईल

या प्रोमोत अक्षय बेअर ग्रिल्स सोबत जंगलात फिरताना आणि स्टंट करताना दिसत आहे. शोचे नाव 'इन टू द वाइल्ड विथ बेरअ ग्रेल्स अँड अक्षय कुमार' असे आहे. हा कार्यक्रम हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड, तेलगू, बंगाली आणि इंग्रजी अशा सात भाषांमध्ये भारतासह जपान, चीन, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशियासह 50 देशांमध्ये प्रसारित होणार आहे.