आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता अमर उपाध्याय टीव्ही मालिका ‘मोलक्की’ मध्ये 42 वर्षीय वीरेंद्रची मुख्य भूमिका साकारत आहे. तो 19 वर्षीय मुलीला विकत घेऊन लग्न करतो. नुकतेच अभिनेत्याने दिव्य मराठीशीसोबत चर्चा केली. यात त्याने या मालिकेविषयी, एकता कपूरसोबतच्या कामाविषयी संवाद साधला...
या शोच्या आधी, वधू खरेदी करण्याची प्रथा असल्याचे मला माहीत नव्हते. जेव्हा मी याबद्दल ऐकले तेव्हा मी इंटरनेटवर बरेच संशोधन केले. संशोधनादरम्यान कळाले, या ‘मोलक्की’ सुनांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जाते. लोक या पद्धतीचा चुकीचा फायदा घेत असल्याचे मला असे वाटते. हा एक सामाजिक मुद्दा आहे आणि म्हणूनच मी या कार्यक्रमास सहमती दिली. आम्ही शोच्या माध्यमातून या महिलांच्या चांगल्यासाठी संदेश देणार आहोत.
मी जवळपास 15 वर्षानंतर एकता कपूरसोबत काम करणार आहे आणि तिच्याबरोबर काम करण्याचा हा एक चांगला अनुभव असल्याचा मला विश्वास आहे. तिचा पूर्णतेवर विश्वास आहे. ती एखाद्या पात्राचे वर्णन करते, तेव्हा अभिनेते स्वत: त्यात सहभागी होतात. 20 वर्षांपूर्वी तिने मला ‘क्याेंकी सास भी कभी बहु थी’ च्या मिहिरबद्दल सांगितले तेव्हा ती फक्त एकच गोष्ट म्हणाली, ‘अमर तुला रामासारखे पात्र साकारायचे आहेत. ज्याप्रमाणे रामायणमध्ये अरुण गोविल यांनी भूमिका साकारली होती. तशीच. त्यानंतर मी तसा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. या मालिकेसाठीही मी असाच काहीसा प्रयत्न केला आहे. लोकांना आवडेल, ही अपेक्षा.
हा कार्यक्रम हरियाणाच्या कथेवर आधारित आहे आणि म्हणूनच त्या भूमिकेसाठी बरेच वर्कशॉप्स कराव्या लागल्या. हरियाणवी भाषेपासून ते देहबोलीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर काम करावे लागले. गेल्या काही महिन्यांपासून प्रशिक्षण घेत आहे जिथे मी ऑनलाइन भाषा शिकत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.