आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Amidst Cancer Treatment, Natukaka Aka Ghanshyam Nayak Went To Gujarat For Shooting, Said– I Am Very Positive

तारक मेहता का उल्टा चश्मा:शोमधील नट्टू काका उर्फ घनश्याम नायक यांच्यावर पुन्हा कर्करोगावरील उपचार सुरू, आजारपणादरम्यान दमनमध्ये  केले चित्रीकरण

किरण जैनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घनश्याम यांचे पुन्हा सुरु झाले केमोथेरपी सेशन

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत नट्टू काकाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक यांच्यावर पुन्हा एकदा कर्करोगावरील उपचार सुरू करण्यात आले आहेत. अलीकडेच भास्करसोबत झालेल्या संभाषणादरम्यान घनश्याम यांचा मुलगा विकास यांनी सांगितले की, सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या गळ्यावर काही डाग आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर पुढील उपचार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

घनश्याम यांचे पुन्हा सुरु झाले केमोथेरपी सेशन
विकास यांनी सांगितल्यानुसार, “एप्रिल महिन्यात आम्ही त्यांच्या गळ्याचे पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी स्कॅनिंग केले होते, ज्यात पुन्हा काही स्पॉट्स आढळले. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा वेदना नव्हती. परंतु आम्हाला कोणताही धोका घ्यायचा नव्हता. त्यामुळे आम्ही पुन्हा त्यांचे केमोथेरपी सेशन सुरु केले आहेत. त्यांच्यावर याआधी ज्या रुग्णालयात उपचार झाले होते, तेथेच पुन्हा केमोथेरपी सेशन घेतले जात आहेत. माझे वडील पूर्णपणे ठीक आहेत, महिन्यातून एकदा आम्ही त्यांना सेशनसाठी रुग्णालयात घेऊन जातो. पुढच्या महिन्यात पुन्हा पीईटी स्कॅन होईल. मला आशा आहे की, तोपर्यंत ते स्पॉट नष्ट होतील."

मुंबईत शूटिंग सुरू होण्याची वाट बघत आहेत घनश्याम
गेल्या आठवड्यात 77 वर्षीय घनश्याम नायक यांनी गुजरातच्या दमण शहरात 'तारक मेहता'च्या एका स्पेशल एपिसोडचे चित्रीकरण पूर्ण केले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर सुरु असलेले उपचार आणि शूटिंगच्या अनुभवाबद्दल सांगितले होते. घनश्याम म्हणाले होते, “मी बरा आहे. हो पण उपचार पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. सध्या केमोथेरपीचे सेशन चालू आहेत. जवळजवळ चार महिन्यांनंतर मी गेल्या आठवड्यात दमणमध्ये एक खास सीन शूट केला आणि मला तिथे खूप मजा आली. सध्याच्या स्टोरीलाइननुसार, नटुकाका सध्या त्यांच्या गावी आहेत आणि तेथून ते जेठालालला फोन करतात. हाकॉल सीक्वेन्स शूट करण्यासाठी मी गुजरातला गेलो होते. आता मी मुंबईत शुटिंग सुरू होण्याची वाट पाहात आहे." गेल्या वर्षी घनश्याम नायक यांच्या घश्यावर शस्त्रक्रिया झाली होती ज्यामध्ये 8 गाठी काढण्यात आल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...