आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारक मेहता का उल्टा चश्मा:राज अनादकटसोबतच्या डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेल्या मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर लिहिले - 'जगा आणि जगू द्या'

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुनमुन दत्ताने तिला ट्रोल करणा-यांना एक विनंती केली आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत एकत्र काम करत असलेले राज अनादकट आणि मुनमुन दत्ता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. हे दोघे खासगी आयुष्यात एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मालिकेत राज टप्पूची तर मुनमुन बबिता जीची भूमिका साकारत आहे. मात्र हे दोघेही डेटिंगच्या बातम्यांमुळे नाराज आहेत. यापूर्वी मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत डेटिंगच्या बातम्यांवर संताप व्यक्त केला होता. आता तिने तिला ट्रोल करणा-यांना एक विनंती केली आहे.

मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, 'मुविंग ऑन!! सकारात्मक गोष्टींसह पुढे जात आहे, जगा आणि जगू द्या. सर्वांना प्रेम, शांती आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा, जय श्री राम, गणपती बाप्पा मोरया, जय माता दी.'

यापूर्वी मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर एक लांबलचक नोट लिहिली होती आणि तिला ट्रोल करणा-यांना चांगलेच सुनावले होते. पण नंतर तिने तिची पोस्ट डिलीट केली होती. यात तिने लिहिले होते, 'एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर काल्पनिक बातमी देण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले आहेत? तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या आयुष्यावर जो काही परिणाम होतो किंवा बदल होतो त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात का? एखाद्या स्त्रीने नुकताच तिचा मुलगा किंवा मग प्रियकर गमावला असेल तरी तुम्ही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढतात, हे सगळे फक्त तुम्ही तुमच्या टीआरपीसाठी करता. पाहिजे तसे वृत्त किंवा हवे ते हेडिंग देत तुम्ही कोणाच्या ही प्रतिष्ठेला धक्का देऊ शकतात, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर तुम्ही या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटली पाहिजे.'

पुढे मुनमुन म्हणाली होती, ‘मी तुमच्या सगळ्यांकडून खूप चांगल्या अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र, कमेंट सेक्शनमध्ये जो तुम्ही अश्लीलपणा केला आहे, एवढेच नाही तर आपला समाज कसा मागासलेल्या विचारांचा आहे हे कथित शिक्षकलेल्या लोकांनी दाखवले आहे. तुमच्या विनोदासाठी स्त्रियांना नेहमीच त्यांच्या वयावरून कमीपणा दाखवला जातो. तुमच्या या विनोदाचा समोरच्या व्यक्तीवर काही परिणाम होतो किंवा नाही याचे तुम्हाला काही वाटतं नाही. 13 वर्षांपासून तुमचे मनोरंजन करत आहे आणि माझी प्रतिष्ठा उद्वस्त करण्यासाठी तुम्हाला 13 मिनिटेदेखील लागली नाहीत. त्यामुळे पुढच्यावेळी जर कोणी नैराश्येचा सामना करत असेल किंवा स्वत: चा जीव घेण्याचा प्रयत्न करत असेल तर थांबून जरा विचार करा, हे सगळे तुमच्यामुळे तर झालेले नाही ना. आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय,’ अशी संतप्त प्रतिक्रिया मुनमुनने दिली होती.

राजने देखील केले होते खंडन
राजने मुनमुन दत्तासोबतच्या त्याच्या नात्यावर प्रतिक्रिया देत डेटिंगच्या वृत्ताचे खंडन केले होते. त्याने लिहिले होते, ‘माझ्याबद्दल माझ्या संमतीशिवाय सातत्याने लिहित असलेल्या प्रत्येकासाठी... जरा विचार करा, तुमच्या या सगळ्या कथांमुळे माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो. अशा सगळ्या बातम्या लिहिणाऱ्या सगळ्यांनी तुमच्यात असलेली ही क्रिएटिव्हिटी इतर गोष्टींमध्ये वापरा, त्याच्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल. देवा त्यांना सद्बुद्धी दे,’ अशा आशयाची पोस्ट राजने शेअर केली होती.

बातम्या आणखी आहेत...