आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

केबीसी 12 वर संकट:अमिताभ यांच्या शूटवर आधीच होता सस्पेन्स, आता ते कोविड-19 पॉझिटिव्ह ठरल्याने अडणीत आणखीन वाढ

किरण जैन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 65 वर्षे व त्याहून अधिक वयाचे कलाकार आणि तंत्रज्ञ सेटवर उपस्थित राहू शकणार नाहीत.
  • 77 वर्षीय अमिताभ कोविड-19 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे ते बरे झाल्यानंतरदेखील शोच्या शूटवरुन संभ्रमाची परिस्थिती आहे.

'कौन बनेगा करोडपती' या गेम शोच्या 12 व्या सीझनवर मोठे संकट उभे राहिले आहे. शूटिंगसंबंधी सरकारने जे नियम आखून दिले आहेत, त्यानुसार 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या कलाकारांना शूटिंगची परवानगी नाहीये. आता केबीसी 12 चे होस्ट 77 वर्षीय अमिताभ बच्चन कोविड पॉझिटिव्ह असल्याने या शोच्या चित्रीकरणाच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. या कार्यक्रमाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, शोच्या टेलिकास्टला आता काही महिन्यांपर्यंत उशीर होऊ शकतो. यापूर्वी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे पर्व सुरू करण्याची निर्मात्यांची योजना होती.

  • निर्माते आणि चॅनेल द्विधा मनस्थितीत

अमिताभ बच्चन कोविड पॉझिटिव्ह असल्याने मेकर्स आणि चॅनेल पेचात सापडले आहेत. सूत्रांनी सांगितल्यानुसार, सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील कलाकार आणि तंत्रज्ञांना सेटवर उपस्थित राहण्याची परवानगी नाही. यामुळे, शोचे  77 वर्षीय होस्ट अमिताभ कसे शूट करू शकतील याबद्दल मेकर्स आधीच पेचात सापडले होते. मात्र जसजसा वेळ जाईल तसे मार्गदर्शक सूचनाही बदलू शकतील, अशी त्यांना आशा होती. 

या आशेवरच ते सप्टेंबरमध्ये हा शो सुरू करण्याचा विचार करीत होते. पण आता अमिताभ यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शोच्या प्रीमियरची तारीख लांबणीवर टाकण्यावाचून पर्याय उरलेला नाही. त्यामुळे काही महिने हा शो पुढे ढकलल्याची चर्चा आहे.

  • स्पर्धकांच्या निवडीस एक महिना लागू शकेल

सूत्रांच्या माहितीनुसार, या शोसाठी स्पर्धकांच्या निवडीची प्रक्रिया मे महिन्यातच सुरू झाली होती. यावेळी निवडीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली जात आहे, जे स्वतःच एक मोठे आव्हान आहे. ही प्रक्रिया अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेत आहे. कारण निर्मात्यांना कोणत्याही प्रकारची चूक करायची नाहीये.  त्यामुळे यास आणखी एक महिना लागू शकेल. अशा परिस्थितीत अमिताभ यांना फ्लोअरवर येण्यास बराच काळ होता.  नियोजनानुसार त्यांना कॅम्पेन शूट घरुनच करायचे होते. पण ते आता कसे पूर्ण करतील? यावर संभ्रम आहे.

  • मागील सीझनपेक्षा यंदा कमी भाग असू शकतात

मागील सीझनच्या तुलनेत यावेळी एपिसोड्सची संख्या कमी असल्याचे ऐकिवात आहे. याबद्दल सूत्रांनी सांगितले की, होय, हे घडू शकते. लोकप्रियतेमुळे आतापर्यंत जवळपास तीन महिने एक सीझन सुरु राहायचा. परंतु यावेळी वेळापत्रक बदलू शकते. भागांची संख्या कमी होऊ शकते आणि स्वरूप देखील बदलू शकते. अमिताभ बरे झाल्यावर याची चर्चा होईल.

  • चॅनेल होस्ट बदलण्याच्या बाजूने नाही

चॅनेल आणि निर्माते सध्या या कार्यक्रमासाठी नवीन होस्ट आणण्याच्या बाजूने नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे जुना अनुभव आहे. वास्तविक, शोचे 11 सीझन आतापर्यंत प्रसारित झाले आहेत. यापैकी 10 सीझन अमिताभ बच्चन यांनी होस्ट केले असून या सर्वांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पण तिस-या सत्रात जेव्हा शाहरुख खानने बिग बींची जागा घेतली होती, तेव्हा त्याच्या रेटिंगमध्ये मोठी घसरण दिसून आली होती.