आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'पाकिजा' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाजलेला चित्रपट. पाकिजा हे कमाल अमरोहींचे सुंदर स्वप्न होते. हा चित्रपट बनण्यास चौदा वर्षांचा कालावधी लागला. या चित्रपटात मीना कुमारी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आपल्या दीर्घ आजारातही मीना कुमारी यांनी हा चित्रपट पूर्ण केला होता. याच चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या सेटवर शेअर केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, कमाल अमरोही यांनी 'पाकीजा'मध्ये मीना कुमारींच्या डान्स सिक्वेंससाठी कारंजात गुलाब जल टाकले होते
असा निघाला 'पाकीजा' या चित्रपटाचा उल्लेख
हॉटसीटवर अमिताभ यांच्यासमोर स्पर्धक म्हणून अफनीस नाज बसल्या होत्या. त्यांना प्रश्न म्हणून पकिजा या शब्दाचा अर्थ विचारला गेला होता. या प्रश्नामुळे अमिताभ यांना पाकीजा चित्रपटाशी निगडित एक खास गोष्ट आठवली आणि त्यांनी ती सर्वांसोबत शेअर केली. त्यांनी सांगितल्यानुसार, ताज महलसमोर जसे कारंजे लागले आहेत, तसेच चित्रपटाच्या सेटवर तयार करण्यात आले होते. कमाल अमरोही यांना चित्रपटातील प्रत्येक सीन परफेक्ट हवा होता. म्हणून त्यांनी मीना कुमारी यांच्या डान्स सिक्वेंससाठी कारंजात गुलाब जलचा वापर केला होता.
पाकिजा पूर्ण व्हायला 14 वर्षांचा लागला होता काळ
मेघनाद देसाई यांच्या पाकीजा या पुस्तकानुसार मीना कुमारी यांनी या चित्रपटासाठी केवळ टोकन रक्कम म्हणून फक्त एक रुपया घेतला होता. हा चित्रपट मीना कुमारींचा शेवटचा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाच्या दरम्यान मीना यांनी कमाल अमरोहींशी निकाह केला होता. आपल्या दीर्घ आजारातही त्यांनी हा चित्रपट पूर्ण केला. त्याच काळात भारत-पाक युद्धास सुरुवात झाली. आणि चित्रपट सुपर फ्लॉप ठरला. 'पाकिजा' प्रदर्शित झाल्यानंतर केवळ आठ महिन्यानंतर मीना कुमारी यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर 'पाकिजा' ला नव्याने प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर मात्र या चित्रपटाने देशात अनेक आठवडे हाऊसफुल्ल ठरून नवनवीन रेकॉर्ड नोंदवले होते. हा चित्रपट तयार व्हायला तब्बल 14 वर्षांचा काळ लागला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.