आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वयाच्या 77 व्या वर्षी 17 तास अविरत काम:'केबीसी 12' च्या शूटिंगवरून परतल्यानंतर रात्री अडीच वाजता अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले - मी थोड्या वेळापूर्वीच कामावरुन परतलोय

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी रात्री केबीसी 12 च्या शूटिंगहून परतल्यानंतर बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये फोटो शेअर केले.
  • 28 सप्टेंबरपासून सुरु होणार केबीसीचे 12 वे पर्व.

सुपरस्टार अमिताभ बच्चन हे सध्या 'कौन बनेगा करोडपती 12' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. 77 वर्षीय बिग बींनी गुरुवारी या गेम शोसाठी 17 तास नॉन स्टॉप शूट केले. त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. बिग बींनी गुरुवारी मध्यरात्री 2:37 वाजता लिहिले, "मी थोड्या वेळापूर्वीच कामावरुन परतलो आणि दिवसातील सुमारे 17 तास काम केले. कोविड -19 पासून पीडित शरीरासाठी पुरेसे आणि फायदेशीर आहे."

  • शोच्या स्पर्धकांबद्दलही सांगितले

ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी आपल्या शोच्या स्पर्धकांबद्दलही सांगितले. त्यांच्या मते आर्थिक अडचणी असूनही या स्पर्धकांच्या चेह-यावर हास्य आहे. फास्टिंग फिंगर फर्स्ट जिंकणार्‍या स्पर्धकांची भावना सांगताना त्यांनी लिहिले, "ते भावनिक होतात, हात जोडून घेतात, अखेर प्रतिक्षा संपली म्हणून हॉट सीटसाठी उत्साहित होतात."

अमिताभ यांच्या मते, स्पर्धकांना आशा असते की आता त्यांच्या कर्जाची परतफेड होऊ शकेल, आजारी लोकांवर उपचार होतील, स्वत: चे घर बांधू शकतील आणि मुलांचे भविष्य सुरक्षित करतील. ते लिहितात, "अनेकांनी एवढ्या किंमतीचा चेक कधीच आपल्या आयुष्यात हातात घेतला नाही. बरेच लोक कुतूहलामुळे चेकवरील शून्य मोजायला सुरुवात करतात आणि मध्येच अडकतात, योग्य उत्तर दिल्याचा एवढा आनंद की त्यांनी याची अपेक्षादेखील केली नसते."

  • एका दिवसात 7 चित्रपटांचे चित्रीकरण केले होते

अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले होते की, त्यांनी एका दिवसात 7 चित्रपट (4 पूर्ण लांबीचे आणि 3 शॉर्ट फिल्म) शूट केले. त्यांनी लिहिले होते, "कामासाठी सर्वात चांगला दिवस, जेव्हा प्रत्येकजण आराम करत असतो. रविवारी. 4 चित्रपट, 3 शॉर्ट फिल्म, 6 क्रोमा शूट, स्टिलचे 2 सेट."

  • 28 सप्टेंबरपासून सुरु होणार केबीसी

'केबीसी 12' 28 सप्टेंबरपासून सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. यावेळी शोची टॅगलाइन आहे, "प्रत्येक गोष्टाला ब्रेक मिळू शकतो, स्वप्नांना नाही." या गेम शोचा पहिला सीझन 2000 मध्ये आला होता. तिसरे पर्व वगळता इतर सर्व पर्वांचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन यांनी केले आहे. तिसर्‍या पर्वात होस्ट म्हणून शाहरुख खान झळकला होता.