आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Amitabh Bachchan Started Shooting For 'Kaun Banega Crorepati 12', Shared A Photo Of The Crew Wearing PPE Kit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंग अपडेट:अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती 12'च्या चित्रीकरणाला केली सुरुवात, पीपीई किट घातलेल्या क्रूचा फोटो शेअर करुन म्हणाले...

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोटो शेअर करुन अमिताभ यांनी लिहिले, कामावर परतलोय.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कोरोनावर मात दिल्यानंतर आता कामावर परतले आहेत. त्यांनी त्यांच्या लोकप्रिय ‘कौन बनेगा करोडपती’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. सेटवरील फोटो शेअर करुन चित्रीकरणाला सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. बिग बींनी शेअर केलेल्या फोटोत क्रू मेंबर्स पीपीई किटमध्ये दिसत आहेत.

फोटो शेअर करुन अमिताभ यांनी लिहिले, ''कामावर परतलोय. निळ्या पीपीईच्या समुद्रात केबीसी 12 सुरु... 2000 मध्ये सुरु आज 2020... 20 वर्षांचा प्रवास... शानदार...'' असे कॅप्शन त्यांनी फोटोला दिले आहे. यापूर्वी ट्विटरवर देखील बिग बींनी कामाला सुरुवात केल्याचे सांगितले होते.

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे ‘केबीसी’च्या या 12 व्या पर्वाचे काम रखडले होते. लॉकडाऊनच्या काळात अमिताभ यांनी घरी राहूनच केबीसीसाठी नोंदणीचे आवाहन करणाऱ्या प्रोमोचे चित्रीकरण केले होते.