आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा 'कौन बनेगा करोडपती'चे नवीन पर्व लवकरच घेऊन येत आहेत. सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर 'कौन बनेगा करोडपती'च्या 13 व्या पर्वाची नुकतीच घोषणा केली आहे. येत्या 10 मेपासून या शोसाठी नोंदणी सुरू होत असल्याचे व्हिडिओद्वारे चॅनलने उघड केले आहे. आतापर्यंत या क्विझ शोचे 12 सीझन प्रसारित झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील पर्व कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत बायो बबलमध्ये शूट करण्यात आले होते.
सोनी टीव्हीच्या सोशल मीडिया हँडलवर केबीसीच्या 13 व्या सीझनची माहिती देणारी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात नमूद केले आहे की, 'पुन्हा एकदा अमिताभ बच्चन घेऊन येत आहेत केबीसीसाठी लाखमोलाचे प्रश्न. तर फोन उचला आणि तयारीत राहा कारण नोंदणीला 10 मे पासून सुरुवात होणार आहे. #KBC13 ची नोंदणी.'
गेल्या वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे या शोमध्ये काही बदल करण्यात आले होते. ऑडिअन्स पोल लाईफलानचे ‘व्हिडिओ- अ फ्रेंड लाईफलाइन’ मध्ये रूपांतरीत करण्यात आले होते. तसेच स्पर्धकांचे ऑनलाईन ऑडिशन घेण्यात आले होते. कोरोनामुळे ‘केबीसी 12’ च्या सेटवर क्रू मेंबर्सनी पीपीई कीट घालून आणि सर्व कोविड नियमांचे पालन करून चित्रीकरण करण्यात आले होते. यंदाच्या 13 व्या सीजनमध्येही अशाच प्रकारे शुटिंग करण्यावर निर्मात्यांचा विचार सुरू आहे.
निवड चार टप्प्यात केली जाईल
केबीसी 13 साठी नोंदणी सोनी टीव्हीवर 10 मे रोजी रात्री 9 वाजता सुरू होईल. जिथे लोकांना अमिताभ यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. आपण यासाठी सोनी लाइव्ह अॅप देखील वापरू शकता. मागील वर्षीप्रमाणे यावेळीदेखील, नोंदणी, स्क्रीनिंग, ऑनलाईन ऑडिशन आणि वैयक्तिक मुलाखत अशा चार भागांनंतर स्पर्धक हॉट सीटपर्यंत पोहोचू शकतील. 'हू व्हाँट्स टू बी मिलियनेअर' या शोपासून प्रेरित असलेला कौन बनेगा करोडपती हा शो लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 2000 मध्ये हा शो लाँच करण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.