आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'सुपरस्टार सिंगर 2' या रिअॅलिटी शोचा प्रोमो नुकताच रिलीज झाला. या शोमध्ये अभिनेता वरुण धवन, कियारा अडवाणी आणि अनिल कपूर खास पाहुणे सहभागी झाले आहेत. 'जुग जुग जियो' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने हे कलाकार या शोच्या सेटवर पोहोचले होते. शोमधील एका स्पर्धकाचा परफॉर्मन्स पाहून आणि त्याची कहाणी ऐकून अभिनेते अनिल कपूर अतिशय भावूक झालेले प्रोमोत दिसत आहेत. यावेळी त्यांना त्यांच्या आईच्या आठवणीत अश्रू अनावर झाले होते.
अनिल कपूर म्हणाले, “मणी आणि त्याच्या आईला पाहून मला माझे बालपण आठवले. ती शिलाई मशीन आठवली. ती हाताने आणि पायाच्या सहाय्याने चालायची. तू जसा पँट आणि शर्ट घातला आहे, तसे शर्ट माझी आई माझ्यासाठीही बनवायची." पुढे या लहानग्या स्पर्धकाला आशीर्वाद देताना अनिल कपूर म्हणाले, "आज मी इथे बसलो आहे. उद्या तू पण खूप मोठा होशील आणि आमच्यासारखा इथे बसशील". व्हिडिओ पहा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.