आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात अभिनेता:'पटियाला बेब्स' फेम अभिनेता अनिरुद्ध दवेची कोरोनामुळे प्रकृती बिघडली, ICU मध्ये दाखल; मैत्रीण म्हणाली - 'कृपया त्याच्यासाठी प्रार्थना करा'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भोपाळमध्ये एका वेब सीरिजचे चित्रीकरण सुरु असताना अनिरुद्धला कोरोनाचा संसर्ग झाला.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता अनिरुद्ध दवेची गेल्या आठवड्यात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पण आता त्याची तब्येत बिघडली असून त्याला आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. अनिरुद्धची मैत्रीण आस्था चौधरी हिने चाहत्यांना अनिरुद्धसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

भोपाळमध्ये चित्रीकरणादरम्यान झाला संसर्ग

अनिरुद्धने 'शक्ति : अस्तित्व के एहसास' की आणि 'पटियाला बेब्स' या मालिकांमध्ये काम केले आहे. 23 एप्रिल रोजी त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. भोपाळमध्ये एका वेब सीरिजचे चित्रीकरण सुरु असताना अनिरुद्धला कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. पण अनिरुद्धची तब्येत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

भोपाळमध्ये रुग्णालयात उपचार सुरु

अनिरुद्धच्या जवळचा मित्र अजय सिंह चौधरीने याबाबत माहिती दिली आहे. ‘अनिरुद्ध जेव्हा वेब सीरिजचे चित्रीकरण करत होता तेव्हा त्याला कोरोना झाला. त्याने मुंबईत परत येण्याऐवजी भोपाळमधील रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. पण नुकताच समोर आलेल्या रिपोर्टनुसार त्याला जास्त इंफेक्शन झाले आहे. त्यामुळे त्याला आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे’ असे अजय सिंह म्हणाला.

'कृपया प्रार्थना करा'

याशिवाय अनिरुद्धची मैत्रीण आस्था चौधरी म्हणाली, 'अनिरुद्ध दवेसाठी प्रार्थना करा. तो आयसीयूत आहे. कृपया एका मिनिटाचा वेळ काढून त्याच्यासाठी प्रार्थना करा.'

सोशल मीडिया पोस्टद्वारे स्वतः दिली होती माहिती

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अनिरुद्धने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी तो म्हणाला ‘मी स्वत:ला एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करुन घेतले आहे. तसेच सर्वांनी काळजी घ्या.’ तसेच अनिरुद्धने सोशल मीडियावर देखील पोस्ट शेअर करत कोरोना झाल्याची माहिती गेल्या आठवड्यात दिली होती.

अनिरुद्ध अक्षय कुमार स्टारर 'बेल बॉटम' या चित्रपटात दिसणार आहे. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात अनिरुद्धला मुलगा झाला.

बातम्या आणखी आहेत...