आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Aniruddh Dave Hospitalized Since 22 Days Came Out ICU After 14 Days And Gave Health Update 85% Infection Will Take Time

कोरोनाशी लढतोय टीव्ही अभिनेता:22 दिवसांपासून रुग्णालयात आहे अनिरुद्ध, 14 दिवसांनंतर आयसीयूमधून बाहेर येऊन म्हणाला - मला आता स्वत: श्वास घ्यायचा आहे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 23 एप्रिल रोजी अनिरुद्धने सोशल मीडियावर त्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी शेअर केली होती.

34 वर्षीय टीव्ही अभिनेता अनिरुद्ध दवे मागील 22 दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून कोरोनाशी लढा देतोय. भोपाळमधील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून 14 दिवसांनंतर त्याला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर अनिरुद्धने सोशल मीडियावर स्वतःचे हेल्थ अपडेट दिले आहे. यापूर्वी 23 एप्रिल रोजी सोशल मीडियावर कोरोनाची लागण झाल्याची बातमी त्याने शेअर केली होती.

मुळचा जयपूरचा असलेला अनिरुद्ध भोपाळमध्ये एका वेब सीरिजचे शुटिंग करत होता. यावेळी, त्याला कोरोनाची लागण झाली.

फुफ्फुसांमध्ये 85 टक्के इन्फेक्शन आहे

अनिरुद्धने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'आभार... हा खर तर खूप छोटा शब्द आहे. गेल्या 22 दिवसांपासून रुग्णालयातील बेडवर तुम्हा सर्वांच प्रेम, आशिर्वाद, प्रार्थना आणि आपुलकी मला जाणवतेय. मी पुर्ण वेळ ऑक्सिजन सपोर्टवर आहे. मात्र जी हिंमत मिळाली ती केवळ तुमच्यामुळे... 14 दिवसांनंतर आयसीयूच्या बाहेर आता थोडं बरं वाटतंय. फुफ्फुसांमध्ये 85 टक्के इन्फेक्शन आहे. थोडा वेळ लागेल, काही घाई नाही. फक्त आता स्वत: श्वास घ्यायचा आहे मला... लवकरच भेटू... भावूक झालो तर माझे सॅच्युरेश कमी होते... मी मॉनिटरमध्ये पहिले आहे... लवकरच सगळं काही ठीक होईल, हे मला माहित आहे... ही वेळही निघून जाईल. 22 वा दिवस, माझ्यासाठी प्रार्थना करत राहा...' असे अनिरुद्ध म्हणाला आहे.

अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम'मध्ये दिसणार आहे
याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात अनिरुद्धला मुलगा झाला आहे. अनिरुद्ध हा टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने 'राजकुमार आर्यन', 'वो रहने वाली महलों की', 'रुक जाना नहीं', 'सूर्यपुत्र कर्ण', 'यारों का टशन', 'पटियाला बेब्स' आणि 'शक्ती अस्तित्व के अहसास की' या मालिकांमध्ये काम केले आहे. 'तेरे संग' आणि 'प्रणाम' सारख्या चित्रपटांमध्येही तो झळकला.अक्षय कुमार स्टारर आगामी 'बेल बॉटम' या चित्रपटात अनिरुद्ध एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...