आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेल्या अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी यांच्या लग्नाला आज 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. 14 ऑक्टोबर 2013 रोजी लग्नगाठीत अडकण्यापूर्वी हे दोघे तीन वर्ष रिलेशनशिपमध्येही होते. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांनी घरीच एक छोटाखानी सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनचे रोमँटिक फोटो दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. छायाचित्रांमध्ये बेबी बंप दाखवणा-या अनिताने याला अॅनिव्हर्सरीऐवजी बेबीमुनिव्हर्सरी असे नाव दिले आहे.
पहिल्यांदा आई होणा-या अनिता हसनंदानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सेलिब्रेशनची छायाचित्रे शेअर करताना कॅप्शनमध्ये ' बेबीमुनिव्हर्सरी' असे लिहिले आहे. या छायाचित्रांमध्ये ती ब्लॅक पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसतेय. तर रोहित रेड्डीनेही दोघांचा एक रोमँटिक छायाचित्र शेअर करुन अनिताला आपला सोलमेट म्हटले आहे.
View this post on InstagramBabymooniiversary 🥰 In pics you’ll also find the biggest baby 👶 swipe➡️
A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani) on Oct 14, 2020 at 1:03am PDT
अनिताच्या ड्रेसची झाली चर्चा
अनुष्का शर्मा आणि हार्दिक पांड्या यांची पत्नी नताशा स्तानकोविक आपल्या गरोदरपणाची बातमी देताना पोल्का डॉट ड्रेस घातला होता, त्यानंतर ट्रोलर्सनी हा ड्रेस गर्भवती महिलांचा अधिकृत ड्रेस म्हणून घोषित केला होता. आता अनितानेही तिच्या लग्नाच्या वाढदिवशी बेबी बंप फ्लॉन्ट करताना पोल्का डॉट ड्रेस घातला होता, ज्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. काही लोकांनी अनिता प्रेग्नन्सीचा ट्रेंड फॉलो करतेय, असे म्हणून तिला ट्रोल केले. तर काहींनी तिला प्रेग्नन्सी आणि ड्रेसच्या कनेक्शनविषयी विचारणा केली.
View this post on InstagramA post shared by Rohit Reddy (@rohitreddygoa) on Oct 13, 2020 at 8:53pm PDT
लग्नाच्या 7 वर्षानंतर आई होतेय अनिता
अनिता आणि रोहितने अलीकडेच ते लवकरच आईबाबा होणार असल्याची घोषणा केली. अनिताने एका क्यूट व्हिडिओच्या माध्यमातून ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली, ज्यात तिने आपली पहिली भेट, साखरपुडा, लग्न आणि प्रेग्नन्सीपर्यंतचा प्रवास दाखवला आहे.
View this post on Instagram❤️+❤️=❤️❤️❤️ Love you @rohitreddygoa #gettingreadyforreddy
A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani) on Oct 10, 2020 at 5:24am PDT
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.