आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही अपडेट:‘कुंडली भाग्य’मध्ये अंकित गुप्ताची एंट्री, प्राची आणि रणबीरच्या आयुष्यात होणार उलथापालथ

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या आठवड्यात पृथ्वीचा (संजय गगनाणी) धाकटा भाऊ पवनच्या रूपात प्रेक्षकांना अंकित गुप्ताचा मालिकेत प्रवेश झाल्याचे पाहायला मिळेल.

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या ‘कुंडली भाग्य’ या मालिकेच्या कथानकाला आता नवी कलाटणी मिळत आहे. करण (धीरज धूपर) आणि प्रीताच्या (श्रध्दा आर्य) विवाहातील नाट्याने प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता मालिकेत अंकित गुप्ता या कलाकाराचा प्रवेश झाला असून आगामी भागात तो प्री-रान (प्राची आणि रणबीर) यांच्या जीवनात वादळ निर्माण करताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

येत्या आठवड्यात पृथ्वीचा (संजय गगनाणी) धाकटा भाऊ पवनच्या रूपात प्रेक्षकांना अंकित गुप्ताचा मालिकेत प्रवेश झाल्याचे पाहायला मिळेल. आता तोसुध्दा लुथ्रा परिवारात वादळ निर्माण करील का, ते पाहायला लागेल. अभिनेता अंकित गुप्ताची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. पृथ्वीप्रमाणेच याची व्यक्तिरेखाही नकारात्मकच असेल. आता शर्लिन आणि माहिरा यांच्या मदतीने हा अभिनेता करण आणि प्रीता यांच्या जीवनातही काही उलथापालथ घडवून आणेल का, ते लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

मालिकेतील आपल्या प्रवेशाबद्दल अंकित गुप्ता म्हणाला, “टीव्हीवरील इतक्या प्रचंड लोकप्रिय मालिकेत मला भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्याबद्दल मी स्वत:ला अतिशय भाग्यवान समजतो. झी टीव्ही वाहिनीवरील मालिकेत मी प्रथमच भूमिका रंगविणार आहे आणि त्यामुळे मी अधिकच उत्सुक आहे. कुंडली भाग्यसारख्या लोकप्रिय मालिकेत भूमिका रंगवताना काही जबाबदार्‍्याही अंगावर येतात आणि मी त्या योग्य प्रकारे पार पाडेल, अशी आशा बाळगतो. एक अभिनेता म्हणून मी पवनची व्यक्तिरेखा उभी करण्यास उत्सुक आहे. ही व्यक्तिरेखा तशी नकारात्मकच असली, तरी मलाही अशा प्रकारची व्यक्तिरेखा साकारण्याची बर्‍्याच काळापासून प्रतीक्षा होती. अशा व्यक्तिरेखा साकारताना तुम्हाला अनेक प्रयोग करता येतात आणि तुमचं अभिनयकौशल्य पणाला लागतं. आता मालिकेत माझा प्रवेश कधी होतो आहे, त्याची मी अधीरतेने वाट पाहात असून करण आणि प्रीताच्या आयुष्यात मी उलथापालथ घडविताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.”

बातम्या आणखी आहेत...