आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या शोमध्ये सहभागी होणार नाही अंकिता:'बिग बॉस 15'मध्ये दिसणार नाही अंकिता लोखंडे, म्हणाली - या शोमध्ये मी सहभागी होणार असल्याचे वृत्त खोटे आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंकिताने बिग बॉस या शोमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. छोट्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर अंकिताने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. कंगना रनोट स्टारर 'मणिकर्णिका' या चित्रपटात अंकिता महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. आता अंकिता सलमान खानच्या बिग बॉस सीझन 15 मध्ये झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र आता स्वतः अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत बिग बॉस या शोमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अंकिता म्हणाली - शोमध्ये सहभागी होणार असल्याचे वृत्त खोटे
अंकिताने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बिग बॉस 15 या शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना लिहिले, 'मी यावर्षी बिग बॉस या शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या बातम्या अनेक मीडिया रिपोर्टसमध्ये येऊ लागल्या आहेत. पण मी हे सांगू इच्छिते की, मी बिग बॉस या शोमध्ये सहभागी होणार नाहीये. या शोमध्ये मी सहभाग घेणार असल्याचे वृत्त निराधार आहे. मी अशा कोणत्याच गोष्टीचा भाग होणार नसतानाही लोकांनी लगेचच घाई करत मला व्देषपूर्ण प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे,' असे अंकिता म्हणाली आहे.

बिग बॉसच्या घराचे डिझायनिंग सुरू झाले
बिग बॉस सीझन 15 ची तयारी सुरू झाली असून ओमंग कुमार यांनी बिग बॉसच्या घराच्या डिझायनिंगचे कामही सुरू केले आहे. या वेळी सेलिब्रिटींसह काही सामान्य लोकांना शोमध्ये सहभागी केले जाई, असे काही रिपोर्ट्समध्ये सांगितले गेले आहे. हा शो 6 महिने चालणार आहे, परंतु टीव्हीवरील प्रसारण फक्त 4 महिन्यांसाठी असेल.

शोमध्ये लवकरच सर्वसामान्यांचा समावेश करण्यात येणार असून व्हूटच्या माध्यमातून प्रेक्षक त्यांना वोट करतील असे सांगण्यात येत आहे. यानंतर फायनल कॉमनर्सची निवड केली जाईल. ऑगस्टमध्ये हा रिअॅलिटी शो सुरू होईल अशा बातम्या आहेत.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिलादेखील निर्मात्यांनी बिग बॉसच्या 15 व्या पर्वासाठी विचारणा केल्याचे म्हटले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉसचे निर्मात्यांनी या कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. रिया ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी होती. त्याच्या निधनानंतर ती चर्चेत आली होती. रियाशिवाय वरुण सूद, नेहा मर्दा, भूमिका चावला, पार्थ समथान, सुरभी चंदना, दिशा वकानी, कृष्णा अभिषेक या पर्वात सहभागी होऊ शकतात अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

बातम्या आणखी आहेत...