आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने अलीकडेच 'झी रिश्ते अवॉर्ड्स 2020' साठी एका खास सादरीकरणाचे चित्रीकरण पूर्ण केले. या सादरीकरणाच्या माध्यमातून अंकिताने तिचा माजी प्रियकर दिवंगत सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली वाहिली. यावेळी, असा एक प्रसंग आला जेव्हा अंकिता भावूक झाली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू आले.
अंकिता म्हणाली - आमचे नाते अमर आहे
सेटवर हजर असलेल्या एका सूत्राने दैनिक भास्करला सांगितले की, "अंकिताने इतके सुंदर सादरीकरण केले की प्रत्येकजण निःशब्द होता. यावेळी सुशांतच्या आठवणींनी अंकिता भावूक झाली आणि तिचे डोळे पाणावले. सुशांतबद्दल बोलताना ती म्हणाले - पवित्र नाही, आमचे नाते अमर आहे. सुशांत आम्हा सर्वांना तुझी खूप आठवण येते."
'पवित्र रिश्ता'च्या पात्रात केले परफॉर्म
सूत्रांनी पुढे सांगितले की, 'पवित्र रिश्ता' या मालिकेतील भूमिकेतून अंकिताने हे सादरीकरण केले. तिने मालिकेचा ट्रॅक 'साथिया तूने क्या किया' तसेच 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील 'कौन तुझे', 'राब्ता'मधील 'मैं तेरा बॉयफ्रेंड' आणि 'केदारनाथ'मधील 'स्वीटहार्ट' आणि 'नमो नमो' या गाण्यांवर सादरीकरण केले. याशिवाय सुशांतच्या 'का पो छे' आणि 'दिल बेचरा' या चित्रपटांतील गाण्यांचाही यात समावेश होता.
14 जून रोजी सुशांतचा मृतदेह घरात सापडला
यावर्षी 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतचे निधन झाले. त्याचा मृतदेह मुंबईतील त्याच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. अंकिता आणि सुशांत 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर जवळ आले होते. दोघेही जवळपास 6 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले आणि त्यानंतर 2016 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.