आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या 'पवित्र रिश्ता 2' मुळे चर्चेत आहे. या मालिकेचे पहिले पर्व प्रचंड गाजले होते. 2009 मध्ये पवित्र रिश्ता हीमालिका प्रसारित झाली होती. या मालिकेत अंकिताने अर्चनाची भूमिका तर सुशांत सिंह राजपूतने मानवची भूमिका साकारली होती. सुशांत आता या जगात नाही. मालिकेच्या दुस-या पर्वात आता अभिनेता शाहीर शेख मानवच्या भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच अंकिताने एका मुलाखतीत सुशांतबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत आणि त्याच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सादेखील सांगितला आहे.
अंकिता म्हणाली, 'सुशांतसोबतची पहिली भेट खूप विचित्र होती. सुशांत शाहीरसारखा शांत होता, शाहीरसारखाच त्याचे काम करत होता. तो त्याच्याच विश्वात रमला होता. एकदा आम्हाला प्रोमो शूटसाठी जायचे होते म्हणून सुशांत मला घेण्यासाठी घरी आला. तो घराखाली उभा राहून माझी वाट पाहत होता. मला आठवते की मला उशीर झाला होता. माझा मेकअप वगैरे पहाटे 4 वाजता झाला होता आणि सुशांत सकाळी 5 वाजता मला घ्यायला आला होता. पण मी 6 वाजता तयार होऊन खाली आले होते. त्यावेळी सुशांत प्रचंड चिडला होता.'
ती पुढे सांगते, 'यानंतर सुशांतने मला आणि माझ्या आईला कारच्या मागच्या सीटवर बसायला सांगितले. मी कारमध्ये झोपले; एकतर मी उशीरा आले आणि त्यातच गाडीत झोपले म्हणून सुशांत माझ्यावर रागावला होता. त्यानंतर सुशांतने ड्रायव्हरला ड्रायव्हिंग सीटवरून उठायला सांगितले आणि स्वतः गाडी चालवायला सुरुवात केली. त्याने त्यावेळी रॅश ड्रायव्हिंग केली होता. तो हे का करत होता हे मला समजू शकले नाही, पण माझ्या आईने सांगितले की तो खूप रागावला होता. मी माझ्या आईला म्हटले की, तर मी काय करु शकते? त्याने खाली उभे राहण्याऐवजी घरी यायला हवे होते. आमची पहिली भेट अशाप्रकारे झाली होती. त्यावेळी सुशांतला वाटले होते की, मी हीरोइनसारखा एटिट्यूड दाखवतेय.'
अंकिता-सुशांत 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते
'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर अंकिता आणि सुशांत यांच्यात सुत जुळले होते. हे दोघे सहा वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते. मात्र 2016 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते. अंकिताला या ब्रेकअपमधून सावरायला बराच वेळ लागला होता. आता ती विकी जैन नावाच्या उद्योगपतीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अंकितापासून वेगळे झाल्यानंतर सुशांतचे नाव कृती सेननसोबत जुळले होते. त्यानंतर तो रिया चक्रवर्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. अंकिता यावर्षी विकीसोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.