आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावरून:अंकिता लोखंडेने शेअर केले लग्नाचे फोटो, म्हणाली - आता आम्ही अधिकृतपणे मिस्टर आणि मिसेस जैन आहोत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंकिताने लग्नात सुंदर सोनेरी रंगाचा लेहेंगा घातला होता.

अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा प्रियकर विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर अंकिताने तिच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आणि सांगितले की ती आता अधिकृतपणे मिसेस जैन झाली आहे. अंकिताची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अंकिताने लग्नात सुंदर सोनेरी रंगाचा लेहेंगा घातला होता, तर तिने तिच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये लाल रंगाची साडी नेसली होती.

मंगळवारी झाला लग्नसोहळा

मुंबईतील पंचतारांकित ग्रॅंड हयातमध्ये अंकिता आणि विकी यांचा विवाहसोहळा पार पडला. कुटुंबिय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत दोघांनी सात फेरे घेतले. टीव्ही अभिनेता कुशल टंडन, सृष्टी रोडे, मौनी रॉय, युविका चौधरी, सना खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी अंकिताच्या या पोस्टवर कमेंट करत तिला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अंकिता आणि विकीच्या रिसेप्शन पार्टीत दिसले अनेक सेलेब्स

लग्नाचे विधी आटोपल्यानंतर अंकिता आणि विकीने रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि नवविवाहित अंकिता आणि विकीसोबत खूप मजा केली. त्यांच्यासोबत बरेच फोटो क्लिक केले. रिसेप्शन पार्टीत अंकिताने लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती. तर विकीने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती.

बातम्या आणखी आहेत...