आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Ankita Lokhande's Husband Vicky Jain Is Making His Acting Debut; Pooja Banerjee Left 'Kumkum Bhagya' Before Becoming A Mother, TV Updates

टीव्ही अपडेट्स:अंकिता लोखंडेचा पती विकी जैन अभिनय क्षेत्रात करत आहे पदार्पण; पूजा बॅनर्जीने प्रसुतीपुर्वी 'कुमकुम भाग्य'मधून घेतली एक्झिट

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीव्ही विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी....

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन लवकरच अंकितासोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अलीकडेच अंकिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आणि त्यांच्या शोचा प्रोमो शेअर करत अभिनय विश्वात विकीचे स्वागत केले आहे. प्रोमो शेअर करताना अंकिताने लिहिले की, "तुलाही अभिनय करता येईल, हे माहित नव्हते, लाइट, कॅमेरा आणि अॅक्शनच्या जगात तुझे स्वागत आहे. मला खात्री आहे की आपण या प्रवासाचा एकत्र आनंद घेऊ आणि आपल्या कायम सोबत राहतील अशा सुंदर आठवणी एकत्र आणू." अंकिता विकीसोबत 'स्मार्ट जोडी' नावाच्या शोमध्ये दिसणार आहे.

पूजा बॅनर्जीने आई होण्यापूर्वी 'कुमकुम भाग्य' मालिका सोडली

'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्री पूजा बॅनर्जी लवकरच आई होणार आहे. प्रसुतीपूर्वी पूजाने 'कुमकुम भाग्य' या मालिकेला निरोप दिला आहे. नुकतेच तिने शोमधील तिच्या भागाचे शूटिंग पूर्ण केले आणि यावेळी शोच्या संपूर्ण टीमने तिला निरोप दिला. पूजा बॅनर्जीने तिच्या फेअरवेल पार्टीचा एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "या सुंदर प्रवासासाठी कुमकुम भाग्य टीमचे आभार. सेटवर माझ्या प्रेग्नेंसीदरम्यान माझ्यावर प्रेम केल्याबद्दल मी संपूर्ण टीमची आभारी आहे."

बातम्या आणखी आहेत...