आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अनुपमा शो अपडेट:12 वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक करत आहेत अन्नू कपूर, म्हणाले, 'मी शूटिंगसाठी 80 दिवसानंतर माझ्या फार्महाऊस बाहेर पडलो आहे'

किरण जैनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दैनिक भास्करशी संवाद साधताना अन्नू कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
Advertisement
Advertisement

प्रसिद्ध अभिनेते, होस्ट आणि गायक अन्नू कपूर लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करीत आहे. होय, अलीकडेच त्यांनी राजन शाही यांच्या आगामी ‘अनुपमा’ या मालिकेसाठी शूट केले. या शोमधील त्यांची व्यक्तिरेखा एंट्री शोची प्रमुख अभिनेत्री रुपाली गांगुलीच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभवणारी असेल, असे म्हटले जात आहे. 

या मालिकेशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "निर्माता राजन शाही त्यांची 'अनुपमा' ही मालिका ग्रॅण्ड लाँच करण्याची योजना आखत आहे. त्यांनी अन्नू कपूर यांना एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेसाठी कास्ट केले आहे, जे या मालिकेतील स्टोरीलाइनमध्ये एक मोठा बदल आणेल. अलीकडेच त्यांनी शोच्या दुसर्‍या स्टारकास्टसह पहिला भाग शूट केला. शूटिंग दरम्यान राजन शाहीही सेटवर उपस्थित होते. अन्नू यांना सेटवर कम्फर्टेबल वाटावे, यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले."

दैनिक भास्करशी संवाद साधताना अन्नू कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले- "हो, सुमारे 80 दिवसानंतर मी माझ्या फार्महाऊसबाहेर कामावर आलो आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मी बदलापूरमधील माझ्या फार्महाऊसमध्ये माझ्या क्रिएटीव्ह टीमसोबत आहे.  मी या लॉकडाउनमध्ये बरीच कामे केली आहेत, आणि मालिकेसाठी बर्‍याच दिवसांनी शूट करण्याचा एक चांगला अनुभव होता. सध्या मला माझ्या भूमिकेविषयी आणि कथानकाविषयी काहीही बोलण्याची परवानगी नाही. मी एवढेच सांगू शकतो की ते एक अतिशय मजेदार पात्र आहे.'

अन्नु कपूर तब्बल 12 वर्षांनंतर टीव्हीवर परतत आहेत. त्यांनीनी अखेरचे 2008 मध्ये छोटा पॅकेट बडा धमाका या रिएलिटी शोमध्ये काम केले होते. यानंतर ते आता 'अनुपमा' या शोमधून कमबॅक करत आहेत.  यापूर्वी हा शो 16 मार्च रोजी प्रसारित होणार होता, परंतु कोरोनाच्या उद्रेकामुळे लॉकडाऊन जाहिर झाले आणि या मालिकेचे प्रक्षेपण लांबणीवर पडले. या शोव्यतिरिक्त, अन्नू लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार्‍या विद्युत जामवाल स्टारर 'खुदा हाफिज' चित्रपटात दिसणार आहेत.

Advertisement
0