आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बिग बॉस 14 या प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये मनोरंजनाचा तडका लावण्यासाठी निर्माते शक्य तितके सर्व प्रयत्न करताना दिसत आहेत. सोमवारच्या भागात बिग बॉस की अदालत या स्पेशल सेगमेंटमध्ये फराह खान पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. या सेगमेंटमध्ये ती स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसली. फराहने यावेळी स्पर्धकांची फक्त शाळाच घेतली नाही तर सर्वांना योग्यरीत्या हा खेळ खेळण्याचा सल्लादेखील दिला.
आता हा कार्यक्रम अधिक मनोरंजक करण्यासाठी, निर्मात्यांनी दिवाळी स्पेशल सेगमेंटसाठी काही संगीतकार-गायकांनाही साइन केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निर्मात्यांनी अनु मलिक, शान आणि सचिन-जिगर या गायक-संगीतकारांना शोसाठी साइन केले आहे. हे संगीतकार त्यांच्या संगीताच्या माध्यमातून स्पर्धकांची दिवाळी खास बनवतील.
मीटूमध्ये नाव आल्याने अनु मलिक यांना इंडियन आयडॉल सोडावे लागले होते
या आधी अनु मलिक ‘इंडियन आयडॉल’मध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी अनु मलिकवर ‘मीटू’चे आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे त्यांना ‘इंडियन आयडॉल’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र, त्यांच्यावरील कुठलेही आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे आता पुन्हा एकदा अनु मलिक ‘बिग बॉस’च्या मंचावरून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
या आठवड्यात वाईल्ड कार्ड एंट्री झालेल्या नैना सिंहला पुन्हा घरी परतावे लागले आहे. तर घरातून बाहेर गेलेल्या कविता कौशिकला पुन्हा एकदा घरात पाचारण करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.