आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली:'बऱ्याच गोष्टी बोलायच्या राहून गेल्या...', माधवी गोगटे यांच्या निधनावर 'अनुपमा'ची भावूक पोस्ट

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुपाली गांगुलीने सोशल मीडियाद्वारे माधवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चित्रपट आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या अभिनेत्री माधवी गोगटे यांचे रविवारी मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाने निधन झाले. त्या 58 वर्षांच्या होत्या. गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा या लोकप्रिय नाटकांमध्ये तसेच घनचक्कर, सत्त्वपरीक्षा, डोक्याला ताप नाही अशा काही मराठी चित्रपटांबरोबरच मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले. माधवी यांच्या निधनानंतर कलाविश्वातून शोक व्यक्त होत आहे.

अलीकडेच त्यांनी 'अनुपमा' या लोकप्रिय हिंदी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या मालिकेत त्यांनी अनुपमा ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुलीच्या आईची भूमिका साकारली होती. रुपाली गांगुलीने सोशल मीडियाद्वारे माधवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

'बऱ्याच गोष्टी बोलायच्या राहून गेल्या.. सद्गती माधवीची,' असे लिहित रुपालीने तिच्या भावना व्यक्त केल्या.

माधवी यांच्यासोबतचा सेटवरचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला.

माधवी यांची मैत्रीण नीलू यांनी लिहिली इमोशनल पोस्ट

टीव्ही अभिनेत्री निलू कोहली यांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहित माधवी यांना श्रद्धांजली वाहिली. 'तू आम्हाला सोडून गेलीस यावर माझा विश्वासच नाही. हे जग सोडून जाण्याचे तुझे वय नव्हते. जेव्हा तू माझ्या मेसेजना रिप्लाय दिला नव्हतास तेव्हा मी फोन करून तुझ्याशी बोलायला हवे होते. आता मी फक्त पश्चात्तापच करू शकते', असे त्यांनी लिहिले.

माधवी गोगटे यांचा जन्म 7 ऑगस्ट 1964 रोजी झाला. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. 1987 मध्ये ‘सूत्रधार’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर 1990 मध्ये आलेल्या ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष लोकप्रिय ठरली होती. गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा या नाटकांसोबतच अंदाज आपला आपला अशा मराठी नाटकात त्या झळकल्या. तर ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकेत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

बातम्या आणखी आहेत...