आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीची नाराजी:कॉमेडी सर्कसच्या एडिटर्सवर नाराज अर्चना पूरन सिंह म्हणाल्या - शोमध्ये मी जिथे हसत नव्हते तिथे देखील माझे हसणे एडिट करुन वापरले जायचे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्चनाला त्यांच्या जुन्या शोमुळे झालेला तोटा आजही सहन करावा लागतोय

अभिनेत्री अर्चना पूरन सिंह यांनी अलीकडेच एका मुलाखतीत आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'द कपिल शर्मा शो'मध्ये अर्चना हसण्याशिवाय काहीच करत नाहीत, असा दावा अनेकदा केला गेला आहे. यावर त्या म्हणाल्या की, कॉमेडी शोमधील मी प्रत्येक गोष्टीवर हसत नाही. कॉमेडी सर्कसमध्ये जिथे मी हसत नव्हते तिथेदेखील माझ्या हसण्याचे शॉट्स जोडले जायचे, असा खुलासादेखील त्यांनी केला आहे.

अर्चना कॉमेडी सर्कसच्या निर्मात्यांवर नाराज
अर्चना म्हणाल्या, "टीम (कॉमेडी सर्कस) अशाप्रकारे एपिसोड्स एडिट करायचे की, माझे हसणे जवळजवळ प्रत्येक एपिसोडला जोडेल जायचे. अगदी जिथे मी हसत नव्हते, तिथेदेखील मी हसताना दाखवले जायचे. मी अगदी कंटाळवाण्या विनोदावर हसत असल्याचे दाखवले जायचे. पण प्रत्यक्षात मी हसत नव्हते. माझ्याकडे निर्मात्यांच्या विरोधात काहीच नाही, परंतु एडिटिंग टीमने त्याबद्दल काळजी घेतली नाही याचे मला वाईट वाटते."

अर्चनाला त्यांच्या जुन्या शोमुळे झालेला तोटा आजही सहन करावा लागतोय
अर्चना आपल्या बचावात म्हणाल्या, "तासन् तास बसून एखादे अॅक्ट जज करणे सोपे नाही. त्याचप्रमाणे, जर तुम्ही कपिलच्या शोवर लक्ष दिले तर मी प्रत्येक विनोदावर हसत नाही. पण कॉमेडी सर्कसमुळे अर्चना केवळ हसतच असते त्याशिवाय काहीही करत नाही, असे जे लोकांना वाटत आहे, ते मी बदलू शकलेले नाही. तो तोटा मला आजही सहन करावा लागतोय.'

सिद्धू यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने अर्चना पूरन सिंह नाराज नाहीत
अलीकडेच नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तेव्हापासून, अर्चना पूरन सिंह आणि कपिल शर्मा शोशी संबंधित मीम्स सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले आहेत. आता नवज्योत पुन्हा शोमध्ये येणार आणि अर्चनाला रिप्लेस करणार अशी चर्चा आहे. त्यावर अर्चना यांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने मी काळजीत नाही. अर्चना यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये 'द कपिल शर्मा शो' मध्ये विशेष अतिथी म्हणून क्रिकेटर-राजकारणी नवज्योतसिंग सिद्धू यांची जागा घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...