आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्चना पूरण सिंगचा खुलासा:अर्चनाने सांगितले- 4 वर्षे लपवून ठेवली होती लग्नाची गोष्ट, नवरा परमीत सेठीचे कुटुंबीय होते लग्नाच्या विरोधात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्चनाने आपल्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला.

'द कपिल शर्मा शो'मध्ये अभिनेत्री अर्चना पुरण सिंगने तिच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. अर्चनाने सांगितल्यानुसार, तिने आणि परमीत सेठी यांनी तब्बल चार वर्षे आपल्या लग्नाची गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. कारण अर्चना अभिनेत्री असल्याने परमीतच्या आईवडिलांचा या लग्नाला विरोध होता.

'द कपिल शर्मा शो' या विनोदी कार्यक्रमाच्या 6 डिसेंबर रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये नवविवाहित दाम्पत्य गायिका नेहा कक्कर आणि रोहन प्रीत सिंग सेलिब्रिटी गेस्ट होते. यावेळी अर्चनाने आपल्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला.

अर्चनाने सांगितल्यानुसार, अभिनेत्री असल्याने परमीतच्या आई-वडिलांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. काहीही झाले तरी अर्चनाशीच लग्न करण्यावर परमीत ठाम होता. आईवडिलांच्या विरोधात जाऊन अर्चनाशी गुपचूप लग्न करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. अर्चना आणि परमीतने कोणालाही न सांगता गुपचूप लग्न केले. विशेष म्हणजे लग्नाच्याच दिवशी अर्चना ही सैफ अली खानच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होती. शूटिंगमधून वेळ काढून तिने परमीतशी लग्न केले आणि त्याची कोणालाच कानोकान खबर लागू दिली नव्हती. लग्नानंतरही चार वर्षांपर्यंत त्यांनी कोणालाच काहीच सांगितले नव्हते. त्यावेळी सोशल मीडिया नसल्याने लग्न केल्याचे लपवणे सोपे गेल्याचे अर्चनाने यावेळी सांगितले.

अर्चना आणि परमीतने 1992 मध्ये केले होते लग्न
1992 मध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातून परमीत सेठी प्रकाशझोतात आला होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी 1992 मध्येच परमीत आणि अर्चना यांनी लग्न केले होते. या दाम्पत्याला आर्यमान आणि आयुष्मान ही दोन मुले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser