आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉस 14 वाद:अर्शी खानने व्यक्त केला संताप, म्हणाली - ‘जान कुमारने मराठीतून माफी मागायला हवी, त्याच्या माफीला काही अर्थ नाही’

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तो एका नामांकित गायकाचा मुलगा आहे. त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानूने मराठी भाषेची चीड येत असल्याचे वक्तव्य केले होते. त्याच्या या वक्तव्यावरुन मोठे वादंग उठले होते. मनसे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सुरुवातीला VICOM 18 नंतर जान कुमार सानू याने माफी मागितली होती. परंतु जान कुमारची माफी बिग बॉस 11 ची एक्स कंटेस्टन्ट अर्शी खान हिला पटलेली नाही. अर्शी खानने जान सानूवर संताप व्यक्त करत त्याने मराठी भाषेतच माफी मागायला हवी, असे म्हटले आहे.

सध्या काय करतेय अर्शी खान आणि काय म्हणाली?
अर्शी खान सध्या एका मराठी गाण्याच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यासाठी ती सध्या मराठी भाषा शिकत आहे. यादरम्यान अर्शी म्हणाली की, 'मराठी भाषेत मी काम करत आहे, त्याचा मला गर्व वाटतो. मला ही भाषा आणि इथले लोक आवडतात. काही दिवसांपूर्वी जान कुमार सानूने बिग बॉसमध्ये मराठी भाषेचा अपमान केला होता. या चुकीसाठी त्याने मराठी भाषेतच माफी मागायला हवी. त्याच्या माफीला काही अर्थ नाही. त्याने मराठीत बोलून सर्वांची माफी मागायला हवी. त्याला ही भाषा त्रासदायक वाटते तर मग आता त्याने याच भाषेत बोलून माफी मागायला हवी. आपण सर्व भाषांचा आदर करायला हवा', असे ती म्हणाली.

View this post on Instagram

MARATHI LOOK #arshi #arshikhan

A post shared by ARSHI KHAN BEGUM SAHIBA AK (@arshikofficial) on Oct 30, 2020 at 11:08pm PDT

पुढे ती म्हणाली, 'तो एका नामांकित गायकाचा मुलगा आहे. त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. असो त्याने माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.'

जान कुमारने मागितली होती आपल्या वक्तव्याबद्दल माफी
जानने मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वादंग उठल्यानंतर बिग बॉसच्या घरात जान याला कन्फेशन रुममध्ये बोलवण्यात आले. यावेळी त्याला कोणतीही भाषा, धर्म आणि जात, सांप्रदाय यावर बिग बॉसच्या घरात चर्चा करण्यास मनाई असल्याचं सूचित करण्यात आले. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात सर्वप्रकारच्या भाषा, जाती-धर्माच्या लोकांचे स्वागत केले जाते, असेदेखील ठणकावून सांगण्यात आले. त्यानंतर जानने माफी मागितली.

अडीच मिनिटांच्या व्हिडिओत जान सानू म्हणाला होता, “नमस्कार माझे नाव जान कुमार सानू आहे. माझ्याकडून नकळत एक चूक झाली, ज्यामुळे मराठी भाषिकांना आणि त्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचली आहे. मी मराठी लोकांची मनापासून माफी मागतो. मराठी भाषिकांना वाईट वाटावे, असा माझा हेतू नव्हता. माझ्यामुळे बिग बॉसलाही शरमेने मान खाली घालाली लागली. त्यामुळे बिग बॉसचीही माफी मागतो. अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही, याची मी काळजी घेईन”, अशा शब्दांत जान याने माफी मागितली आहे.

काय होते संपूर्ण प्रकरण? ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. दरम्यान ती राहुलशी मराठीतून संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसली. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे म्हटले.