आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Arun Govil Was Rejected For Ram's Role, But Ramanand Sagar Had To Change His Decision After Seeing His Smile In The Look Test

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

63 वर्षांचे झाले टीव्हीचे 'राम':प्रभू रामाच्या भूमिकेसाठी रिजेक्ट झाले होते अरुण गोविल, मात्र लूक टेस्टमध्ये त्यांचे स्मितहास्य बघून रामानंद सागर यांनी बदलला होता आपला निर्णय

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अरुण गोविल यांचे स्वप्न उद्योगपती होण्याचे होते.

90 च्या दशकात रामानंद सागर यांची रामायण ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत अभिनेते अरुण गोविल यांनी प्रभू रामाची भूमिका वठवली होती. 12 जानेवारी रोजी अरुण गोविल यांनी वयाची 63 वर्षे पूर्ण केली आहेत. आजही लोक अरुण गोविल यांना प्रभू रामाच्या भूमिकेसाठीच ओळखतात. ते आजही या प्रतिमेतून बाहेर येऊ शकले नाहीत. खरं तर अरुण गोविल यांना अभिनेता व्हायचे नव्हते, त्यांचे स्वप्न उद्योगपती होण्याचे होते आणि ते हे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आले होते.

एका मुलाखती दरम्यान अरुण यांनी सांगितले होते की, रामची भूमिका साकारल्यानंतर लोकांनी त्यांना भगवान राम म्हणून ओळखण्यास सुरुवात केली. ते जिथेही जात असत, लोक त्यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घेत असे. टीव्हीवर 'रामायण' मालिका पाहताना लोक टीव्हीसमोर उदबत्ती लावायचे. इतकेच नाही तर चित्रपटातही त्यांना अशाच भूमिकांच्या ऑफर होऊ लागल्या होत्या, त्यामुळे ते अभिनयापासून दूर गेले. रामायण 25 जानेवारी 1987 रोजी दूरदर्शनवर सुरू झाले होते आणि शेवटचा भाग 31 जुलै 1988 रोजी पाहायला मिळाला होता.

या भूमिकेसाठी रिजेक्ट झाले होते अरुण गोविल
अरुण गोविल सुरुवातीला या भूमिकेसाठी रिजेक्ट झाले होते. याचे कारण म्हणजे रामानंद सागर यांना त्यांची स्मोकिंगची सवय आवडली नव्हती. त्यांच्या मते, व्यसन असलेल्या व्यक्तीला रामाची भूमिका देणार नाही, असे रामानंद सागर यांचे म्हणणे होते. मात्र अरुण गोविल यांनी त्यांना सिगारेटचे व्यसन सोडून देणार असल्याची हमी दिली होती. तरीदेखील रामानंद सागर यासाठी तयार झाले नव्हते. मात्र लूक टेस्टमधील अरुण गोविल यांचे स्मितहास्य बघून रामानंद सागर यांना आपला हा निर्णय बदलावा लागला होता. अशा प्रकारे अरुण गोविल यांना ही भूमिका मिळाली होती.

मेरठमध्ये झाला जन्म
अरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1958 रोजी उत्तर प्रदेशातील राम नगर (मेरठ) येथे झाला. मेरठ विद्यापीठात शिकत असताना त्यांनी काही नाटकांत काम केले. त्यांचे टीनएज सहारनपुरात गेले. अरुणच्या वडिलांची त्यांनी सरकारी नोकरी करावी अशी इच्छा होती पण अरुण यांना असे काहीतरी करण्याची इच्छा होती जे संस्मरणीय असेल. याच कारणास्तव बिझनेस करण्याचे स्वप्न घेऊन ते मुंबईत आले आणि नंतर त्यांनी अभिनयाचा मार्ग निवडला.

मोठ्या पडद्यावर पहिला ब्रेक
छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर त्यांना मोठ्या पडद्यावर पहिली संधी 1977 मध्ये मिळाली. ताराचंद बडजात्या यांचा 'पहेली' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी 'सावन को आए दो' (1979), 'सांच को आंच नही' (1979), 'इतनी सी बात' (1981), 'हिम्मतवाला' (1983), 'दिलवाला' (1986), 'हथकडी' (1995) आणि 'लव कुश' (1997) सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका निभावली.

रामआधी मिळाली होती विक्रमादित्यची भूमिका
रामानंद सागर यांनी अरुण गोविल यांना सर्वप्रथम 'विक्रम और बेताल' या मालिकेतील राजा विक्रमादित्यची भूमिका ऑफर केली होती. याच्या अफाट यशानंतर अरुण यांनी1987 मध्ये 'रामायण'मध्ये भगवान रामची भूमिका साकारली. या भूमिकेमुळे ते इतके लोकप्रिय झाले की आजही लोक त्यांना टीव्हीचा राम म्हणून ओळखतात. अरुण यांनी 'लव कुश' (1989), 'कैस कहूं' (2001), 'बुद्धा' (1996), 'अपराजिता', 'वो हुआ ना हमारे' आणि 'प्यार की कश्ती में' सारख्या बर्‍याच लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

अरुण यांचे कुटुंब
अरुण आपल्या वडिलांच्या आठ मुलांमध्ये (6 मुलगे आणि दोन मुली) चौथ्या क्रमांकावर आहे. श्रीलेखा गोविल असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. अरुण आणि श्रीलेखा यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव अमल आणि मुलीचे नाव सोनिका गोविल आहे.

बातम्या आणखी आहेत...