आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Arvind Trivedi, Ramayan’s Raavan, Dies Of Heart Attack, Arun Govil, Sunil Lahiri And Dipika Chikhlia Pays Tribute

श्रद्धांजली:अभिनेते अरविंद त्रिवेदी यांना 'रामायणा'तील राम, लक्ष्मण, सीता यांनी वाहिली श्रद्धांजली; पंतप्रधान मोदी यांनीही व्यक्त केले दुःख

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत दु: ख व्यक्त केले आहे.

छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे 5 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रात्री दहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरविंद त्रिवेदी यांच्या मृत्यूनंतर 'रामायण' या मालिकेत त्यांच्यासोबत काम केलेल्या अरुण गोविल, सुनील लहिरी आणि दीपिका चिखलिया यांनी त्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत दु: ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना म्हणाले, "अरविंद त्रिवेदी हे एक उत्तम कलाकार तर होतेच, शिवाय ते समाजाबद्दल आत्मियता असलेले व्यक्तिमत्त्व होते. रामायण या मालिकेतील त्यांच्या कामासाठी त्यांना भारतातील येणा-या पिढ्या लक्षात ठेवतील. "

रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत अरुण गोविल यांनी राम, सुनील लहरी यांनी लक्ष्मण आणि दीपिका चिखलिया यांनी माता सीतेची भूमिका साकारली होती. अरुण गोविल यांनी ट्विट करत लिहिले, 'आध्यात्मिक रुपाने रामावतारचे कारण आणि सांसारिक रुपात एक खूपच चांगले, धार्मिक, साध्या स्वभावाचे मनुष्य आणि माझे खूप जवळचे मित्र अरविंद त्रिवेदी हे आज आपल्याला सोडून गेले आहेत. अर्थात ते थेट सर्वोच्च निवासस्थानी जातील आणि त्यांना श्री रामाचा सहवास लाभेल.'

सुनील लहरी यांनी अरविंद यांच्या दोन फोटोंचा कोलाज शेअर करत ट्विट केले, 'अत्यंत दुःखद बातमी आहे की, आमचे लाडके अरविंद भाई (रामायणाचे रावण) आता आपल्यात नाही. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो… माझ्याकडे शब्द नाहीत, मी एक वडील, माझा मार्गदर्शक, हितचिंतक आणि एक सज्जन मनुष्य गमावला आहे.'

दीपिका चिखलिया यांनी लिहिले- 'त्याच्या कुटुंबाला माझे सांत्वन… ते एक अद्भुत व्यक्तिमत्व होते..' अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरो देताना सांगितले होते, 'आज (5 ऑक्टोबर) रात्री 10च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील दोन ते तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. पण त्यांना कुठला आजार नव्हता. पण त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्या शरीराच्या इतर अवयवांनी काम करणे बंद केले होते.'

बातम्या आणखी आहेत...