आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादूरदर्शनवरील रामायण या मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच्या मृत्यूची बातमी खोटी आहे. रविवारी त्यांच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्यानंतर संध्याकाळी त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती देऊन एक ट्विट केले आणि खोटी बातमी पसरवू नये असे आवाहन केले.
कौस्तुभ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, 'प्रिय सर्वजण, माझे काका अरविंद त्रिवेदी लंकेश पूर्णपणे ठीक आणि सुरक्षित आहेत. खोट्या बातम्या पसरवणे थांबवा आणि कृपया ते ठिक असल्याच्या बातम्यांचा प्रसार करा. धन्यवाद'
अरविंद त्रिवेदी यांनी रविवारी केले होते ट्विट
रविवारी दुपारी अरविंद त्रिवेदी यांनी सोशल मीडियावर 'श्रीकृष्णा' या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते सर्वदमन बॅनर्जी यांचे सोशल मीडियावर स्वागत करताना एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते, 'जय श्री कृष्णा ... आपले स्वागत आहे.'
अलीकडेच बनला व्युअरशिपचा नवा रेकॉर्ड
लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी दूरदर्शनने ‘रामायण’ ही मालिका पुनर्प्रक्षेपित केली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अलीकडेच या मालिकेने व्युअरशिपचा नवा विश्वविक्रम नोंदविला आहे. एका ट्वीटमध्ये दूरदर्शनने लिहिले आहे की, 'जागतिक विक्रम, दूरदर्शनवरील रामायणच्या पुनर्प्रक्षेपणाने जगभरात व्युअरशिपचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. हा शो सर्वाधिक बघितला गेलेला शो ठरला आहे. 16 एप्रिल रोजी 7.7 कोटी प्रेक्षकांनी हा शो पाहिला.
गेल्या महिन्यात ट्विटरवर आले होते त्रिवेदी
'लॉकडाउन' सुरू झाल्यानंतर 28 मार्चपासून दूरदर्शनवर 'रामायण'चे प्रसारण सुरू झाले आणि त्याच्या काही दिवसांनी म्हणजे 12 एप्रिल रोजी अरविंद त्रिवेदी यांनी सोशल मीडिया साइट 'ट्विटर'वर प्रवेश केला. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, 'अखेर मी ट्विटरवर आलोय'.
मध्य प्रदेशात झाला अरविंद त्रिवेदींचा जन्म
अरविंद त्रिवेदी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1938 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला होता, परंतु त्यांनी गुजरातला आपली कर्मभूमी बनवली. गुजराती थिएटरमध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांचे भाऊ उपेंद्र त्रिवेदी हे गुजराती चित्रपटांमधील एक लोकप्रिय नाव आहे आणि त्यांनी गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. लंकेश म्हणजेच अरविंद त्रिवेदी यांनी सुमारे 300 चित्रपटांत काम केले आहे. गुजराती भाषेच्या धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांमुळे त्यांना गुजराती प्रेक्षकांमध्ये ओळख मिळाली. टीव्हीचे रावण म्हणजे अरविंद त्रिवेदी हे गुजरातमधील साबरकांठाचे खासदारही राहिले आहेत.
दिवसभर त्यांच्या मृत्यूबद्दल पसरलेल्या अफवा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.