आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वेब सीरीज 'बारिश 2'चे उर्वरित भाग 25 मेपासून सायंकाळी 6 वाजता या वेळेत स्ट्रीम होत आहेत. याची माहिती वेब शोमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री आशा नेगीने ईदच्या शुभेच्छांसह दिली आहे. आशाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सांगतेय की, वेब सीरिज ‘बारिश 2’चे उर्वरित 9 भाग आशा अल्ट बालाजी आणि झी 5 वर स्ट्रीम होत आहेत.
View this post on InstagramBaarish☔️🌸 remaining episodes streaming on @altbalaji and @zee5premium at 6pm! See you guys!
A post shared by MsNegi (@ashanegi) on May 25, 2020 at 3:23am PDT
व्हिडीओत आशा म्हणतेय - घरी राहा, सुरक्षित राहा. भरपूर गोड पदार्थ खा आणि बारिश बघा. अजून आयुष्यात काय हवंय. याआधीही आशा या सीरिजविषयीची माहिती आणि व्हिडीओ सतत अपडेट करतेय.
शोमध्ये शर्मन जोशीसुद्धा दिसणार आहे. या सीझनची खास गोष्ट म्हणजे जम्पिंग जॅक म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत, जे या शोमध्ये शर्मन जोशीचे बॉस बनले आहेत. या सीझनमध्ये ते अनुज आणि गौरवीचे नाते वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहेत.
View this post on InstagramA post shared by MsNegi (@ashanegi) on May 6, 2020 at 5:58am PDT
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.