आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'ससुराल सिमर का' या मालिकेत झळकलेले टीव्ही अभिनेते आशिष रॉय बर्याच दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून शरीरात पाणी जमले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते मुंबईच्या कृती केअर रुग्णालयात दाखल होते, परंतु आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आशिष यांची प्रकृती अद्याप ठीक नाहीये, परंतु आर्थिक अडचणींमुळे त्यांना डिस्चार्ज घ्यावा लागला आहे. नाइलाजाने उपचार अर्ध्यावर सोडून ते घरी परतले आहेत.
आशिष यांच्याकडे पैसे नाहीतः स्पॉटबॉयशी बोलताना आशिष म्हणाले, 'बिले भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याने 24 मे रोजी मला हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. हे बिल 2 लाखांवर पोचले होते, जे मी काही प्रमाणात भरले, पण आता माझ्याकडे पुढील उपचारांसाठी रूग्णालयात दाखल होण्यासाठी पैसे नाहीत.
आशिष पुढे म्हणाले, 'माझे डायलिसिस अद्याप चालू आहे आणि पुढील दोन महिने ते सुरूच राहतील. मला दररोज रुग्णालयात जावे लागते आणि डायलिसिसच्या तीन तासांसाठी सुमारे 2 हजार रुपये खर्च येतो. मी घरी आहे पण खूप अशक्तपणा आहे. एक नोकर आहे जो माझी काळजी घेतो. '
आशिष यांनी सलमानकडे मागितला मदतीचा हात: आशिषच्या दोन किडन्या निकामी झाल्या आहेत. अलीकडेच त्यांनी त्यांचा एक मित्र सूरज थापरच्या माध्यमातून सलमान खान आणि त्याचे फाउंडेशन बीइंग ह्यूमन यांना मदतीसाठी विनंती केली होती. याबद्दल आशिष म्हणाले, 'मी सलमानकडे मदत मागितली आहे पण आतापर्यंत मला कोणतीही मदत मिळाली नाही. अशा परिस्थितीत, मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहे की नाही हे मला माहित नाही.'
आशिष यांच्याजवळ काम नाही : 2019 च्या सुरुवातीच्या महिन्यात आशिष यांना अर्धांगवायू झाला होता. आशिष म्हणाले होते, "मी अर्धांगवायूच्या झटक्यानंतर बरा झालो, पण मला काम मिळाले नाही. मी सध्या माझ्या बचतीवर आयुष्य जगतोय पण तेही संपुष्टात येणार आहे. मला कोलकातामध्ये माझ्या बहिणीकडे शिफ्ट केले जाईल, पण इंडस्ट्रीमधील एखाद्याने मला काम द्यावे, अन्यथा काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे.' आशिष एक व्हॉईस-ओवर आर्टिस्ट असून त्यांनी ‘सुपरमॅन रिटर्न्स, ‘द डार्क नाइट’, ‘गार्जियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘द लेजेंड ऑफ टार्झन’ आणि ‘जोकर’ या हॉलिवूडपटांसाठी डबिंगही केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.