आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाकारासोबत खास बातचीत:'छत्रसाल'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारत आहे आशुतोष राणा, म्हणाले - व्यक्तिरेखेत आपले व्यक्तिमत्त्व डोकावणार नाही याची काळजी घेतो

ज्योती शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा शो 29 जुलैपासून एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम झाला.

आशुतोष राणा “छत्रसाल” या वेबसिरीजसाठी सध्या चर्चेत आहे. यात ते औरंगजेबाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘दिव्य मराठी’शी झालेल्या खास मुलाखतीत आशुतोष यांनी या मालिकेवर मनमोकळी चर्चा केली ...

मालिका कशी मिळाली ?
मी मूळचा बुंदेलखंडचा आहे. त्यामुळे मला या छत्रसालवर आधारित मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. याला मी माझे भाग्य समजतो. निर्माते मला राजाची भूमिका देतील, असे वाटले होते. मात्र निर्मात्यांनी सांगितले, छत्रसाल तू करशील तर औरंगजेब कोण करणार ? कारण औरंगजेब एक क्रूर शासक होता, छत्रसाल राजाने त्याला आव्हान दिले होते. त्यामुळे छत्रसाल राजाचे पात्रही दमदार दाखवायचे होते. त्यामुळे औरंगजेबसाठी त्यांना एक कसलेला कलाकार हवा होता, त्यामुळे त्यांनी मला ही भूमिका दिली आणि मी ती केली.

या नकारात्मक पात्राची तयारी कशी केली ?
निदा फाजली यांचा एक प्रसिद्ध शेर आहे... 'हर आदमी में होते हैं दस बीस आदमी, जिसको भी देखिए कई बार देखिए..’ हा शेर आमच्यासाठीच लिहिला गेला आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा साकारताना त्यात मी दिसणार नाही, याची काळजी घेतो. म्हणजेच त्या पात्रात जीव ओतून काम करतो.

आणखी कोणत्या राजाची भूमिका करावी वाटते ?
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, भगवान कृष्णही आवडतात. याशिवाय मला गुरुगोविंदसिंह, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, चंद्रगुप्त मौर्य, चाणक्य आणि राजा विक्रमादित्य हे माझे आवडते राजे आहेत. याच्या भूमिका करायला मला आवडेल.

बातम्या आणखी आहेत...