आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारक मेहता का उल्टा चष्मा:कलाकार शूटिंग करो अथवा नाही, कोरोना काळात घरबसल्या पगार देत आहेत असित मोदी, कलाकार म्हणाले - 'आमचे निर्माता आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत'

किरण जैनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या किती आहे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील कलाकारांची बेसिक सॅलरी

कोरोनाच्या दुस-या लाटेची झळ सामान्यांसह कलाकारांनाही बसली आहे. महाराष्ट्रात ब्रेक द चेनअंतर्गत टीव्ही मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. अनेक निर्मात्यांनी याकाळात चित्रीकरण मुंबईबाहेर हलवले आहे. तर काही निर्माते लॉकडाऊन संपण्याच्या प्रतिक्षेत आहे. याकाळात निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय. तर कलाकारदेखील शूट कधी सुरू होईल आणि त्यांचे पेमेंट कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत. पण या काळात एक मालिक अशी आहे, ज्यातील कलाकारांना चित्रीकरण न केल्याने फारसे नुकसान होत नाहीये.

ही मालिका म्हणजे छोट्या पडद्यावरील लोकप्रिया 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही आहे. या मालिकेतील कलाकारांना त्यांचे निर्माते असित मोदी घरबसल्या पगार देत आहेत. मग हे कलाकार चित्रीकरण करत असो वा नसो. त्यांची बेसिक सॅलरी दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला जमा होत आहे. प्रत्येक कलाकाराच्या त्याच्या अनुभवानुसार बेसिक सॅलरी निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय महिन्याचे जेवढे दिवस कलाकार चित्रीकरण करतील, त्याचे प्रती दिवसाच्या हिशोबाने पैसे बेसिक सॅलरीसोबत जोडून दिले जात आहेत.

दिव्य मराठीसोबतच्या बातचीतमध्ये या मालिकेत अब्दुलची भूमिका साकारणारे अभिनेते शरद शंकला यांनी सांगितले, “सध्या आमच्या टीममधील काही सदस्य शूटिंगसाठी गुजरातला गेले आहेत. सध्या शोची स्टोरीलाइन कोरोना काळात सुरु असलेल्या काळ्या बाजाराभोवती आहे. या एपिसोडमध्ये गोकुलधाम सोसायटीमधील पुरुषच दिसतील. शोमध्ये मी एका दुकानदाराची भूमिका साकारतो आहे. त्यामुळे मी सध्याच्या भागात फिट बसत नव्हतो. माझ्याप्रमाणे अनेक पात्र या एपिसोडमध्ये फिट बसत नसल्याने चित्रीकरण करत नाहीयेत. गेल्या काही आठवड्यांपासून आम्ही घरीच आहोत," असे त्यांनी सांगितले.

अभिनेते शरद शंकला
अभिनेते शरद शंकला

शरद पुढे म्हणतात, "आमची इंडस्ट्री खूप अनिश्चित आहे. बहुतेक कलाकारांचे उत्पन्न शुटिंगवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत आम्ही भाग्यवान आहोत की आमचे निर्माते आमची खूप काळजी घेत आहेत. जरी आम्ही शूटिंग करत नसलो तरी ते आम्हाला बेसिक सॅलरी देत आहेत. त्यामुळे या अडचणीच्या काळात आम्हाला काहीही त्रास झाला नाही."

या शोमध्ये नटुकाकाची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांना गेल्या वर्षी कॅन्सरचे निदान झाले होते. गेल्या जवळपास दीड वर्षात त्यांनी फक्त 4-5 भाग शूट केले आहेत. असे असूनही, दरमहा पगार त्यांच्या खात्यात जमा होतो. याबद्दल घनश्याम सांगतात, "असित मोदी माझ्यासाठी देव आहेत. मी गेल्या 6-7 महिन्यांपासून काम करत नाही, प्रथम लॉकडाऊनमुळे आणि नंतर माझ्या तब्येतीमुळे. असे असूनही, असितजींनी मला पैसे दिले. ते पैसे मला माझ्या उपचारांसाठी उपयोगी पडले. त्यांनी मला आश्वासन देखील दिले की माझ्या तब्येतीमुळे मी शूट करू शकत नसलो तरी ते माझा पगार कापणार नाहीत. जेव्हा गरज असेल तेव्हा ते नेहमीच माझ्या पाठिशी उभे राहतात. यापेक्षा मी अधिक त्यांच्याकडे काय मागू शकतो. मी त्यांचे जवढे आभार मानेल तेवढे कमी आहेत," अशा शब्दांत घनश्याम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नट्टू काकाची भूमिका साकारणारे घनश्याम नायक
नट्टू काकाची भूमिका साकारणारे घनश्याम नायक

जाणून घ्या किती आहे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील कलाकारांची बेसिक सॅलरी :

  • टप्पू सेना (समय शाह, कुश शाह, राज अनादकत, अझर शेख, पलक सिदवानी) - सुमारे दीड लाख / महिना
  • दिलीप जोशी - सुमारे 3 लाख / महिना
  • शैलेश लोढा - सुमारे 3 लाख / महिना
  • अमित भट्ट / तनुज महाशब्दे / श्याम पाठक / मंदार चांदवडकर - सुमारे अडीच लाख / महिना
  • शरद शंकला - सुमारे दीड लाख / महिना
  • मुनमुन दत्ता / सोनालिका जोशी / अंबिका रंजंकर - सुमारे 2 लाख / महिना
  • सुनैना फौजदार - सुमारे 1 लाख / महिना
बातम्या आणखी आहेत...