आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू एंट्री:'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'मध्‍ये अथर्व कर्वे आणि श्रावणी अभंगची एंट्री, साकारणार भीमराव आणि रमाबाईची भूमिका

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 20 जुलैपासून पटकथा नवीन वळण घेणार आहे.

छोट्या पडद्यावरील 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्‍बेडकर' ही मालिका लोकप्रियतेच्‍या शिखरावर पोहोचली आहे. मालिकेने हिंदी जीईसीमध्‍ये पहिल्‍यांदाच भारताचे प्रेरणादायी नेते डॉ. बी. आर. आंबेडकर यांची अभूतपूर्व कथा सादर करत भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 20 जुलैपासून पटकथा नवीन वळण घेणार आहे, जेथे तरूण 'भीमराव आंबेडकर'ची भूमिका साकारण्‍याची अथर्व कर्वेची निवड करण्‍यात आली आहे आणि श्रावणी अभंग 'रमाबाई आंबेडकर'ची भूमिका साकारणार आहे. नवीन पिढी, नवीन शहर, नवीन विचार पण भेदभाव-असमानतेमध्‍ये काहीच बदल नाही. भीमराव असमानतेविरोधात संघर्ष सुरू करणार आहेत.

भीमराव आंबेडकरांची भूमिका साकारण्‍याबाबत अथर्व कर्वे म्‍हणाला, ''प्रेरणादायी नेते डॉ. बी. आर. आंबेडकर यांची भूमिका साकारण्‍यासाठी निवड होणे हा मोठा सन्‍मान आहे. माझी नेहमीच ही भूमिका साकारण्‍याची इच्‍छा होती आणि माझ्यासाठी हे स्‍वप्‍न पूर्ण झाल्‍यासारखे आहे. बाबासाहेबांचे जीवन व वारसा अनेकांसाठी प्रेरणास्रोत राहिले आहे. त्यांची प्रतिभा व यशस्‍वी कामगिरीची यादी अतुलनीय आहे. उत्तम विचारवंत, नेते, सामाजिक सुधारक, कट्टर राष्‍ट्रप्रेमी व अर्थशास्‍त्रज्ञ आणि सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे भारतीय संविधानाचे शिल्‍पकार. डॉ. बी. आर. आंबेडकर हे सर्वोत्तम नेते होते आणि त्‍यांचा वारसा अद्वितीय आहे. त्‍यांच्‍यासारखे व्‍यक्तिमत्त्व कोणाचेच नाही आणि समाजाप्रती त्‍यांनी दिलेले योगदान उल्‍लेखनीय आहे. अशी प्रभावी भूमिका साकारणे मोठी जबाबदारी आहे आणि माझ्यासाठी हा मोठा क्षण आहे.'

रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारणारी श्रावणी अभंग म्‍हणाली, ''माझी रमाबाईंची भूमिका साकारण्‍यासाठी निवड झाल्याने मी स्‍वत:ला भाग्‍यवान समजते. ही प्रबळ भूमिका साकारण्‍याचा अनुभव अद्भुत आहे. रमाबाई भीमराव आंबेडकर सामाजिक न्‍यायाचे द्योतक डॉ. भीमराव आंबेडकरांसाठी महत्त्वपूर्ण प्रेरणास्रोत राहिल्‍या आहेत. सर्वांना रमाबाईंबाबत खूपच कमी माहित आहे. म्‍हणूनच या मालिकेच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना त्‍यांच्‍याबाबत आणि त्‍यांनी बाबासाहेबांच्‍या जीवनात बजावलेल्‍या भूमिकेबाबत माहित होईल. रमाबाई आंबेडकर या बाबासाहेबांना पाठिंबा देण्‍यासाठी त्‍यांच्‍यामागे खंबीरपणे उभ्‍या राहिल्‍या. त्‍या नम्रता, प्रामाणिकपणा व करूणेच्‍या प्रतीक होत्‍या. रमाबाई आंबेडकर यांच्‍याकडून शिकण्‍यासारखे भरपूर काही आहे. मला ही भूमिका साकारण्‍याची आणि प्रेरणादायी मालिकेची भाग होण्‍याची ही संधी दिल्‍यामुळे खूपच सन्‍माननीय वाटत आहे.''

बातम्या आणखी आहेत...