आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Ayesha Singh's Gets Emotional When Started Shooting For 'Ishq Subhan Allah', Now She Will Be Seen In A New Look In The Serial

भावूक क्षण:‘इश्क सुभान अल्ला’चे चित्रीकरण सुरू करताना आएशा सिंहचे डोळे आले भरून, आता मालिकेत दिसणार आहे नव्या रुपात 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री आएशा सिंह हीच पुन्हा झारा सिद्दिकी या भूमिकेत दिसणार आहे.

सक्तीची घरबंदी आता हळूहळू उठत असून बदलत्या परिस्थितीला जुळवून घेत लोकही कामासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. या स्थितीत झी टीव्हीच्या काही मालिकांचे चित्रीकरणही आता सुरू झाले असून प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तिरेखांची पुन्हा भेट घडवून आणण्यात येत आहे. ‘झी टीव्ही’वरील ‘इश्क सुभान अल्ला’ या लोकप्रिय मालिकेतील झारा सिद्दिकी हीसुध्दा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गतवर्षी ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री आएशा सिंह हीच पुन्हा या भूमिकेत दिसणार आहे.

आएशा सिंहने या भूमिकेसाठी पुन्हा एकदा चित्रीकरणाला प्रारंभ केला आहे. पण अनेक महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा एकदा ही भूमिका साकारण्यासाठी ती सेटवर उभी राहिली, तेव्हा अनेक भावनांनी तिचे मन भरून गेले होते. या मालिकेला तिच्या मनात अगदी खास स्थान आहे. आता अनेक महिन्यांनंतर पुन्हा एकदा ही भूमिका रंगविण्यासाठी ती सेटवर आली असता, आपले पूर्वीचे सहकलाकार आणि कर्मचार्‍्यांच्या आठवणींनी तिचे डोळे पाणावले.

त्या पहिल्या दिवसाची आठवण जागविताना आएशा सिंह म्हणाली, “इतक्या महिन्यांच्या खंडानंतर इश्क सुभान अल्लासाठी पुन्हा चित्रीकरण करणं हे मला स्वप्नवत वाटत होतं. या सेटच्या कानाकोपर्‍्याशी इतक्या आठवणी निगडित आहेत की तिथे आल्यावर मला मी स्वगृहीच आले आहे, असं वाटू लागलं होतं. त्या सेटवर फिरताना माझ्या मनात पुन्हा पूर्वीच्या आठवणींनी गर्दी केली आणि त्यामुळे माझे डोळे भरून आले. बरेच कर्मचारी माझ्यासाठी नवे असले, तरी त्यात मला अदनानचा परिचित चेहरा दिसताच मला खूप आनंद झाला. माझ्या नव्या प्रवासाचा आरंभ अशा छान प्रकारे झाला आणि भविष्यात माझ्या वाटणीला ज्या नव्या घटना येणार आहेत, त्यांच्या कल्पनेने मी थरारून गेले.”

‘इश्क सुभान अल्ला’ या मालिकेच्या पहिल्या सीझनची सांगता ही झाराच्या मृत्यूच्या सूचकतेने झाली होती. पण आपला आवडता नायक कबीर (अदनान खान) आणि झारा हे पुन्हा एकदा एकत्र येतील, या आशेने प्रेक्षक चमत्काराची अपेक्षा करीत होते. मालिकेच्या दुसर्‍्या सीझनचे कथानक नव्या कलाटण्यांनी भरले असून आता झाराच्या भूमिकेत आएशा सिंह नव्या अवतारात दिसणार आहे.