आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविकाने दिली प्रेमाची कबुली:बालिका वधू फेम अविका गौरच्या आयुष्यात झाली 'या' व्यक्तीची एन्ट्री, फोटो शेअर करुन म्हणाली...

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिलिंद चंदवानी हे अविकाच्या प्रियकराचे नाव आहे.

'बालिका वधू' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर हिच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. तिला तिचे प्रेम मिळाले आहे. अविकाने नुकतीच एक पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर तिने तिच्या प्रियकरासोबतचा एक फोटो शेअर केला असून त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे सध्या अविका आणि तिच्या प्रियकराची चर्चा होतेय. मिलिंद चंदवानी हे अविकाच्या प्रियकराचे नाव आहे. तिने शेअर केलेल्या छायाचित्रात हे दोघेही गोव्याच्या समुद्र किनारी रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

अविकाने मिलिंदसाठी लिहिलेल्या पोस्टची सुरुवात 1947 मधील आयकॉनिक फ्रेंच गाणे La Vie En Rose ने केली आहे. याचा अर्थ आयुष्य खूप सुंदर आहे असा होतो. ती म्हणते, 'माझ्या प्रार्थनेला यश आले. माझ्या आयुष्यातील प्रेम मला मिळाले आहे. माझे जग पूर्ण करण्यासाठी मनापासून आभार.' माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा अध्याय सुरु होतोय, असेही ती पुढे म्हणाली आहे.

अविकाची रोडिज फेम मिलिंद चंदवानीसोबतची पहिली भेट एका एनजीओच्या वर्कशॉप दरम्यान झाली होती. त्यानंतर हळूहळू त्यांच्यात सुत जुळले. मिलिंदनेही सोशल मीडियावर अविकासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करुन प्रेमाची कबुली दिली आहे.

अलीकडेच वजन कमी केल्याने आली होती चर्चेत
अविकाने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तब्बल 13 किलो वजन कमी केल्याचे सांगितले होते. तिचा फॅट टू फिटच्या प्रवासाचेही तिने एका नोटमध्ये वर्णन केले होते. वजन कमी करून आणि एक नवी त्वचा मिळाल्याने खूप खुश आहे, असे ती म्हणाली होती.

बातम्या आणखी आहेत...