आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बडे अच्छे लगते हैं 2’:मालिकेत राम कपूरच्या आईच्या भूमिकेत शुभावी चोक्सी तर प्रियाची बहीण मैत्रीच्या भूमिकेत अंजुम फकीहची वर्णी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही मालिका येत्या 30 ऑगस्टपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

एकता कपूरची निर्मिती असलेली 'बडे अच्छे लगते हैं 2' ही मालिका लवकरच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बडे अच्छे लगते हैं' या अत्यंत गाजलेल्या मालिकेचा हा दुसरा सीझन आहे. ही मालिका अशा दोन वयाच्या तिशीत असलेल्या व्यक्तींची गोष्ट आहे, जे त्यांचे लग्न झाल्यानंतर हळूहळू एकमेकांच्या

प्रेमात पडतात.

या मालिकेच्या दुसर्‍या सीझनमध्ये नकुल मेहता आणि दिशा परमार हे कलाकार अनुक्रमे राम आणि प्रिया या व्यक्तिरेखा साकारणार आहेत. सर्वांना माहीतच आहे की, बडे अच्छे लगते हैं एक कौटुंबिक मालिका आहे, ज्यामध्ये अनेक पात्रे आहेत. यात प्रियाची बहीण मैत्रीचे पात्र साकारण्यासाठी अभिनेत्री अंजुम फकीह तर राम कपूरची सावत्र आई नंदिनीच्या भूमिकेसाठी शुभावी चोक्सी यांना घेण्यात आले आहे.

गेल्या एक दशकापेक्षा अधिक काळापासून अंजुम या इंडस्ट्रीत काम करत आहे आणि मनोरंजन व्यवसायातील एक होतकरू अभिनेत्री म्हणून तिने नाव कमावले आहे. या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल अंजुम म्हणते, “अशा प्रसिद्ध मालिकेचा भाग होताना मला खूपच आनंद होत आहे. ही मालिका शहरी एकाकीपण आणि परिपक्व प्रेमावर आधारित असल्याने, टेलिव्हीजनवरील ‘सास-बहू’च्या गोतावळ्यात ही एक आगळीवेगळी, मनाला आल्हाद देणारी मालिका आहे. या मालिकेच्या निमित्ताने काही तरी नवीन करण्यास आणि माझ्या सह-कलाकारांशी मैत्री करण्यास मी उत्सुक आहे.”

छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री शुभावी चोक्सी या मालिकेत राम कपूरच्या सावत्र आईच्या म्हणजे नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्याला मिळालेल्या भूमिकेबद्दल शुभावी चोक्सी म्हणते, “बडे अच्छे लगते हैं मालिकेने टेलिव्हिजनच्या मालिका बघणार्‍या प्रेक्षकांच्या अभिरुचीला नवीन वळण दिले होते. या मालिकेत दाखल होताना आणि या लोकप्रिय फ्रँचाइझचा एक भाग होताना मला किती आनंद होत आहे, हे मी सांगू शकत नाही. मालिकेच्या या दुसर्‍या सत्राबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे आणि पहिल्या सीझनवर प्रेक्षकांनी केलेले प्रेम ते या सीझनवरदेखील करतील अशी मला आशा आहे.”

बडे अच्छे लगते हैं ही मालिका येत्या 30 ऑगस्टपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बातम्या आणखी आहेत...