आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही इंडस्ट्रीमधील कोरोना:'बहु हमारी रजनीकांत' फेम रिद्धिमा पंडितच्या आईचे कोरोनामुळे निधन, अखेरच्या क्षणी कुटुंबातील सदस्यांना भेटता आले नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृत्यूपूर्वी कुटुंबातील सदस्यांना भेटला आले नाही

'बहु हमारी रजनीकांत' फेम अभिनेत्री रिद्धिमा पंडित हिच्या आईचे निधन झाले आहे. वृत्तानुसार त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. एका इंग्रजी न्यूज वेबसाईटने आपल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, रिद्धिमाच्या आईला मूत्रपिंडाच्या आजार होता. कोरोनाची लागण होण्यापूर्वी पर्यंत त्या ब-या होत्या. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मृत्यूपूर्वी कुटुंबातील सदस्यांना भेटला आले नाही
ई-टाईम्सने आपल्या रिपोर्टमध्ये लिहिले, "रिद्धिमाच्या आईचे मुत्रपिंडाच्या आजारावर उपचार सुरु होते. दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे कॉम्प्लिकेशन वाढले. कोरोनाची लागण झाल्याने शेवटच्या क्षणी त्यांना त्यांच्या रुग्णालयात कुटुंबातील कुणालाही भेटता आले नाही.' त्यांच्या निधनाने रिद्धिमासह कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

'खतरों के खिलाडी'ची रनरअप ठरली होती रिद्धिमा

'बहु हमारी रजनीकांत' शिवाय रिद्धिमाने 'ये के हुआ ब्रो', 'हम: आय अॅम बिकॉज ऑफ अस' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे. 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी'च्या 9 व्या सीझनची ती सेकंड रनरअप ठरली होती. याशिवाय 'खतरा खतरा खतरा' या विनोदी मालिकेतही रिद्धिमाने काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...