आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीचा मामला:'बालवीर' फेम अभिनेत्री खुशबू मुखर्जीच्या घरात चोरी, चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने केले लंपास

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खुशबू मुखर्जी हिने मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका बालवीरमध्ये ‘ज्वाला परी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री खुशबू मुखर्जी (खुशी मुखर्जी) हिच्या घरात चोरी झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी रात्री हा चोरीचा प्रकार घडला असून, चोरीत जवळपास 2 लाख किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरले आहेत. खुशबू मुखर्जी मालाड पश्चिमच्या जनकल्याण नगरमधील मरीना प्लाझा इमारतीत राहते. याच इमारतीतील तिच्या 301 नंबरच्या फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खुशबू मुखर्जीने तिच्या राहत्या घरी शुक्रवारी रात्री फोटोशुटचे आयोजन केले होते. यावेळी फोटोशूसाठी बाहेरुन तीन जण आले होते. फोटोशुट झाल्यानंतर खुशबूच्या घरातील जवळपास 2 लाख किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. घडलेला प्रकार लक्षात येताच तिने मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भादविच्या कलम 380 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

खुशबू मुखर्जी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. बालवीर मालिकेत तिने ज्वाला परीची भूमिका साकारली असून या भूमिकेने तिला घराघरांत लोकप्रियता मिळवून दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...