आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

व्हायरल व्हिडीओचा प्रभाव:राजेश करीर यांना 4 दिवसांतच मिळाली बरीच आर्थिक मदत, म्हणाले - 'कृपया आता माझ्या खात्यात आणखी पैसे टाकू नका'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक लोक राजेश यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
Advertisement
Advertisement

अलीकडेच 'बेगूसराय' आणि 'सीआयडी' सारख्या टीव्ही शोमध्ये झळकलेले अभिनेता राजेश करीरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये, त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी लोकांकडे आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. हा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि बर्‍याच लोकांनी त्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला. आता राजेश यांनी लोकांना आणखी आर्थिक मदत करु नये असे आवाहन केले आहे.

राजेश यांनी एक नवीन व्हिडीओ शेअर केला

गुरुवारी राजेश यांनी फेसबुकवर नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी या कठीण काळात आर्थिक मदत करणार्‍या सर्वांचे आभार मानले. राजेश म्हणाले, 'असं वाटतंय जणून संपूर्ण देश मला मदत करायला पुढे आला आहे. मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्या या वाईट काळात तुम्ही सर्वांनी मला मदत केली. परंतु आता माझ्या खात्यात आणखी पैसे टाकू नका, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. रविवार ते गुरुवारपर्यंत मला अपेक्षेपेक्षा जास्त आर्थिक मदत मिळाली आहे. पण आता मला माझ्या कुटुंबाची काळजी स्वतः घ्यावी लागेल. तुम्हा सर्वांचे आभार.'

शिवांगी जोशींनी केली मदत

जे लोक राजेश यांच्या मदतीसाठी पुढे आले त्यात 'बेगूसराय' या मालिकेत राजेश यांच्या मुलीची भूमिका वठवणारी अभिनेत्री शिवांगी जोशी हिचाही समावेश आहे. शिवांगीने त्यांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

स्पॉटबॉयशी झालेल्या संभाषणात राजेशने या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले होते की, "आम्ही सेटवर एकमेकांच्या फारसे जवळचे नव्हतो. असे असूनही, या संकटाच्या काळात तिची मदत माझ्यासाठी लाकमोलाची आहे."

2 जून रोजी व्हायरल झाला होता व्हिडीओ

2 जून रोजी राजेश करीर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ते म्हणाले होते, "मित्रांनो, मी राजेश करीर कलाकार आहे, बरेच लोक मला ओळखत असावेत. गोष्ट अशी आहे की जर मी आता लाज बाळगली तर हे माझ्या आयुष्यासाठी कठीण होईल. सध्या या संकटाच्या काळात मला मदतीची नितांत गरज आहे, माझी परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे, कृपया मला तुमचा मदतीचा हात हवा आहे. माझी विनंती आहे की, मला 300, 400 किंवा 500 रुपयांची मदत करा. कारण शूटिंग कधी सुरु होई आणि मला कधी काम मिळेल, हे ठाऊक नाही. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून माझी आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे." राजेश पुढे म्हणाले, आयुष्ये या वळणावर आले आहे की काही समजत नाहीये, पण मला जगायचे आहे. होय मी जगू इच्छितोे. माझी हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती आहे की, शक्य तितकी मला मदत करा, असे आवाहन त्यांनी केले होते.

Advertisement
0