आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भाबीजी घर पर है:आता अंगुरी भाभी झाली पोलिस इन्‍स्‍पेक्‍टर, मॉडर्न कॉलनीला मिळाला नवीन दरोगा  

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिश्राजींची विलक्षण कृत्‍ये, तिवारीजींची विनोदीशैली ते अंगूरी भाभीची निरागसता व अनिता भाभीच्‍या स्‍मार्टनेससह अनेक नवीन व मजेशीर कथा पाहायला मिळणार आहेत.

अॅण्ड टीव्‍हीवरील लोकप्रिय मालिका 'भाबीजी घर पर है'ने प्रमुख पात्रांची विलक्षण कृत्‍ये, विनोदी शैली व हास्‍यजनक विनोदांसह प्रेक्षकांच्‍या मनावर छाप पाडली आहे. आता आपली लाडकी प्रेमळ व साधीभोळी अंगूरी भाभी (शुभांगी अत्रे) मॉडर्न कॉलनीच्‍या सर्व गुन्‍हेगारांना जेरबंद करण्‍यासाठी पोलिस बनणार आहे. होय, तुम्‍ही बरोबर ऐकले आहे! अंगूरी भाभी ही शहरातील नवीन पोलिस असणार आहे. पण अंगूरी भाभी यामध्‍ये किती यशस्‍वी ठरते, हे पाहणे रंजर असणार आहे. 

आगामी एपिसोड्समध्‍ये अंगूरी तिच्‍या परिसरातील गरीबांना अन्‍न देताना दिसणार आहे. इतरांना मदत करण्‍यासाठी ती करत असलेली पैशाची उधळण पाहून मनमोहन तिवारी (रोहिताश्‍व गौड) पोलिस आयुक्‍तांना तिला अटक करण्‍यास सांगतो. पण फासे उलटे पडतात आणि वरिष्‍ठ पोलिस अधिकारी अंगूरीची पोलिस स्‍टेशनची प्रमुख म्‍हणून नियुक्‍ती करतात. नवीन जबाबदारी स्‍वीकारण्‍यास उत्‍सुक असलेली अंगूरी दुस-याच दिवशी नोकरीवर रुजू होते. 

दरोगा लुकबाबत बोलताना शुभांगी अत्रे म्‍हणाली, ''आपणा सर्वांना माहितच आहे की, मालिका 'भाबीजी घर पर है' लवकरच नवीन एपिसोड्ससह परतणार आहे आणि निश्चितच मॉडर्न कॉलनीमध्‍ये भरपूर मौजमजा व हास्‍यजनक धमाल असणार आहे. मी पहिल्‍यांदाच पोलिसाची भूमिका साकारत आहे. मला सांगावेसे वाटते की, ते अत्‍यंत मनोरंजनपूर्ण होते. साडीमधील लुकवरून पूर्णत: नवीन लुक, तो म्‍हणजे पोलिस इन्‍स्‍पेक्‍टरचा लुक धारण करणे हा उत्‍साहवर्धक ब्रेक होता. पोलिसांची काठी शूटिंग नसताना देखील सर्वांना काबूत ठेवण्‍यामध्‍ये उपयुक्‍त ठरली (हसते). मी त्‍या प्रत्‍येक क्षणाचा भरपूर आनंद घेतला. या सीक्‍वेन्‍ससाठी शूटिंग करताना खूप धमाल आली. इतकी की, मी आमचे चाहते व प्रेक्षक ते पाहण्‍याचा किती आनंद घेतील याची कल्‍पना करू शकते.''   

0