आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'भाभीजी घर पर है' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत मलखानची भूमिका साकारणारा अभिनेता दीपेश भान याचे शनिवारी, 23 जुलै रोजी निधन झाले. 41 वर्षीय दीपेश भानच्या आकस्मिक निधनाने चाहते आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. दीपेश भानच्या अंत्यसंस्कारात मालिकेतील कलाकार पोहोचले होते. यावेळी त्याच्या 18 महिन्यांच्या मुलाला आणि पत्नीला बघून सगळ्यांना अश्रू अनावर झाले होते. 25 जुलै रोजी दीपेशच्या आत्म्याच्या शांतीसाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पाणावलेल्या डोळ्यांनी दिला सगळ्यांनी अखेरचा निरोप दीपेश भानच्या अंत्यसंस्काराला 'भाभाजी घर पर है' या मालिकेतील सहकलाकार उपस्थित होते. दीपेश आता या जगात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. 'भाभीजी घर पर है' या मालिकेत वैभवला अश्रू अनावर झाले होते. या शोमध्ये झळकलेली नेहा पेंडेस एका मुलाखतीत म्हणाली की, तिला कसे रिअॅक्ट करावे हेच कळत नाहीये.
दीपेश भानला शेवटचा निरोप देण्यासाठी आलेले कलाकार...
बायकोला सांत्वन करणे प्रत्येकासाठी कठीण होते दीपेश भानने 17 एप्रिल 2019 रोजी दिल्लीत लग्न केले होते. त्याला एक मुलगा आहे. दीपेशच्या मुलाचा जन्म 14 जानेवारी 2021 रोजी झाला. दिपेशच्या मुलाचे नाव अभी आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी त्याच्या पत्नीच्या अश्रूचा बांध फुटला होता. तिचे सांत्वन करणे उपस्थितांपैकी प्रत्येकाला कठीण झाले होते.
2005 मध्ये मुंबईत आले
2005 मध्ये आला होता मुंबईत दिपेशचा जन्म 11 मे 1981 रोजी झाला. दिपेशचे बालपण आणि शालेय शिक्षण दिल्लीतच झाले. दीपेश भान हा अभ्यासात सरासरी विद्यार्थी होता. 10वीची परीक्षा तो कशीबशी 50 टक्क्यांनी उत्तीर्ण झाला होता. त्याला अभ्यासापेक्षा अभिनयात जास्त रस होता, त्यामुळे त्याने पदवीनंतर थेट नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. NSD मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2005 मध्ये दीपेशने अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबई गाठली. दीपेश भानने भाभी जी घर पर हैंसह कॉमेडी का किंग कौन, कॉमेडी क्लब, भूलवाला, एफआयआर, चॅम्प, सुन यार चिल मार, फालतू उटपटांग चटपटी कहानी आणि मे आय कम इन या शोजमध्ये काम केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.