आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इट्स सेलिब्रेशन टाइम:'भाबीजी घर पर है'ने पुर्ण केले 1400 एपिसोड्स; अंगूरी, विभुती नारायण मिश्रा आणि मनमोहन तिवारी म्हणाले...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकेने नुकतेच 1400 एपिसोड्स पूर्ण केले आहेत.

एण्‍ड टीव्‍हीवरील लोकप्रिय मालिका 'भाबीजी घर पर है'ने पुन्‍हा एकदा नवीन सुवर्ण टप्‍पा गाठला आहे. मालिकेने नुकतेच 1400 एपिसोड्स पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. मालिकेने हसवून-हसवून लोटपोट करणारे विनोद, हास्‍यजनक पात्रं व पटकथेसह प्रेक्षकांच्‍या मनात खास स्‍थान निर्माण केले आहे. अंगूरी, विभुती नारायण मिश्रा व मनमोहन तिवारी या भूमिका साकारणारे अनुक्रमे शुभांगी अत्रे, आसिफ शेख व रोहिताश्‍व गौड यांनी या आनंदमय प्रसंगी जुन्‍या आठवणींना उजाळा दिला.

आतापर्यंतच्‍या उल्‍लेखनीय प्रवासाबाबत बोलताना आसिफ शेख म्‍हणाला, ''विभुतीची भूमिका साकारण्‍याचा आतापर्यंतचा प्रवास अविश्‍वसनीय राहिला आहे. मालिकेचे करण्‍यात आलेले कौतुक व प्रशंसा पाहून मला आनंद झाला आहे. आम्‍ही 1400 एपिसोड्सचा सुवर्ण टप्‍पा पूर्ण करत असताना मी आमचे सर्व कलाकार, टीम, प्रेक्षक व चाहत्‍यांचे आभार मानतो. माझ्यासाठी या मालिकेने अनेक मनोरंजक पात्रं साकारण्‍याची अद्भुत संधी मला दिली आहे. प्रत्‍येक पात्र खास आणि माझ्या मनाच्‍या खूप जवळ आहे. मी असे अनेक क्षण येण्‍यासाठी आणि अशा आणखी नवीन मजेदार पात्रांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यास सज्‍ज आहे. मी माझ्या संपूर्ण बीजीपीएच टीमचे आणि खासकरून सातत्‍याने प्रेम व पाठिंबा दिलेले माझे चाहते व प्रेक्षकांचे आभार मानतो.''

या मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे म्‍हणाली, ''आज बीजीपीएचच्‍या संपूर्ण टीमसाठी हा मोठा व अभिमानास्‍पद क्षण आहे. आम्‍ही 1400 एपिसोड्सचा अद्वितीय टप्‍पा पूर्ण केला आहे. माझ्यासाठी हा प्रवास अत्‍यंत अद्भुत राहिला आहे. बीजीपीएच ही अत्‍यंत लोकप्रिय विनोदी मालिका आहे. तसेच ही मालिका माझ्या देखील आवडीची असून टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. अंगूरी भाभीची भूमिका आणि तिचा संवाद 'सही पकडे है'चे भरभरून कौतुक करण्‍यात आले आहे, जे माझ्यासाठी एक कलाकार म्‍हणून अत्‍यंत प्रेरणादायी आहे. मालिकेचे चाहते, आमचे कलाकार व टीमच्‍या पाठिंब्‍याशिवाय 1400 एपिसोड्सचा हा प्रवास शक्‍य झाला नसता. असे अधिक यशस्‍वी व उल्‍लेखनीय टप्‍पे येतच राहो हीच सदिच्‍छा!''

साधाभोळा मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारा रोहिताश्‍व गौड म्‍हणाला, ''भाबीजी घर पर है या मालिकेने विनोदीशैलीमध्‍ये नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित केले आहेत आणि सतत प्रेक्षकांमध्‍ये लोकप्रिय ठरली आहे. 1400 यशस्‍वी एपिसोड्स पूर्ण करणे हा आम्‍हा सर्वांसाठी मोठा क्षण आहे. आम्‍ही सतत प्रेम व पाठिंबा दिलेले आमचे सर्व चाहते व प्रेक्षकांचे आभार मानतो. तसेच बीजीपीएचचे सर्व कलाकार व टीमचे देखील आभार. आणखी नवीन मजेदार कथानक व पात्रांसह भारतीय प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करण्‍यासाठी असे अनेक क्षण येताना पाहण्‍यास आम्‍ही उत्‍सुक आहोत.''

बातम्या आणखी आहेत...