आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Bhairavi Said, 'When I Was Performing The Character Of Kajal Bhai In Hum Panch, I Would Miss Wearing Clothes Like Girls'.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चर्चा:भैरवी म्हणाली 'जेव्हा मी हम पांचमधील काजल भाईचे पात्र साकारत होती, तेव्हा मुलींसारखे कपडे परिधान करणे मिस करायची'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला तयार व्हायला फक्त 5 मिनिटे लागायची आणि बर्‍याचदा मी घरुनच माझ्या पात्राचे कपडे परिधान करुन यायचे.

लोकप्रिय  'हम पांच' ही मालिका तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रसारित होत आहे. या संदर्भात दैनिक भास्करने या मालिकेत काजल भाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री भैरवी रायचुराशी खास बातचीत केली. यावेळी काजलने या मालिकेशी संबंधित आठवणी शेअर केल्या.

  • 'हम पांच'च्या पुनरागमनाविषयी काय सांगशील?

जेव्हा मला या मालिकेचे कमबॅक होत असल्याचे समजले तेव्हा मी भूतकाळात हरवून गेली.  हम पांचने मला खरी ओळख मिळवून दिली. मी या मालिकेतील सर्व कलाकारांसोबत उत्तम आठवणी शेअर करते. हे खूप रोमांचक आहे, मी चॅनेलवर दररोज ही मालिका बघणार आहे.

  • तू या मालिकेविषयीच्या काही आठवणी शेअर करु शकते?

त्या भूमिकेसाठी एकताने मला कसे आणि का निवडले हे मला अजूनही समजलेले नाही. मला अजूनही आठवतंय जेव्हा मी तिला प्रथम भेटले होते तेव्हा मी खूप गोंधळून गेले होते. टॉम बॉयसारखी दिसणारी एक सुंदर आणि भेकड मुलगी हवी असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. या पात्राची मागणी आव्हानात्मक होती. मी पूर्णपणे क्लूलेस होते, परंतु क्रू सदस्यांनी मला पात्र समजून घेण्यासाठी, भूमिकेत शिरण्यासाठी कसे चालावे, बोलावे किंवा स्वत:चे आचरण कसे असायला हवे हे शिकविण्यात खूप मदत केली.

  • जेव्हा तुला ही भूमिका मिळाली आणि इतकी प्रसिद्धी मिळाली तेव्हा तुझ्या पालकांनी काय प्रतिक्रिया दिली?

मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, म्हणून ही (प्रसिद्धी) माझ्या पालकांसाठी, माझी धाकटी बहीण आणि माझ्या जवळच्या मित्रांसाठी खूप विचित्र होती. मी स्टारडमला माझ्या घरात कधीही येऊ दिले नाही. त्या सर्वांचा मला कायमच पाठिंबा राहिला आणि माझ्या कुटुंबाचा मला अभिमान आहे ज्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. मला आठवतंय की, आधी आमच्याकडे केबल कनेक्शन नव्हते, आईवडिलांची बरीच समजूत घातल्यानंतर त्यांनी केबल कनेक्शन घेतले जेणेकरून आम्ही हम पांच पाहू शकू.

  • काजल भाईच्या भूमिकेमुळे कधी तुला टाइपकास्ट केले गेले का?

देवाच्या कृपेने नाही. मी एकाच वेळी एका वाहिनीवर दुसरेही कार्यक्रम करत होते आणि या कार्यक्रमांमध्ये काजलपेक्षा वेगळी पात्रे मी साकारली होती. जेव्हा मी काजल भाईची व्यक्तिरेखा साकारत होते तेव्हा बहुतेक वेळा माझ्या इतर सह-कलाकारांप्रमाणे कपडे घालण्याची इच्छा व्हायची. मला तयार व्हायला फक्त 5 मिनिटे लागायची आणि बर्‍याचदा मी घरुनच माझ्या पात्राचे कपडे परिधान करुन यायचे. कधीकधी मलाही माझ्या सहकलाकारांप्रमाणे नटायची इच्छा व्हायची. पण नंतर मला आठवायचे की, या मालिकेला माझ्या पात्राने किती महत्त्व आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...