आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीच्या घरी झाले चिमुकल्याचे आगमन:लग्नाच्या 5 वर्षांनी आई झाली भारती सिंग, पती हर्ष लिंबाचियाने सोशल मीडियावरुन दिली आनंदाची बातमी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेलिब्रिटी करत आहेत शुभेच्छांचा वर्षाव

कॉमेडियन भारती सिंग लग्नाच्या 5 वर्षानंतर आई झाली आहे. रविवारी (3 एप्रिल) तिने मुलाला जन्म दिला. भारतीचा नवरा आणि लेखक हर्ष लिंबाचियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. हर्षने भारतीसोबतचा एक अतिशय सुंदर फोटो शेअर करत लिहिले की, "इट्स अ बॉय." भारतीने गेल्या वर्षी तिच्या गर्भधारणेची घोषणा केली होती. तेव्हापासून भारती तिच्या प्रेग्नेंसीमुळे सोशल मीडियावर चर्चेत होती. प्रेग्नेंसीच्या काळात भारतीने ब्रेक न घेता चित्रीकरण सुरु ठेवले होते.

सेलिब्रिटी करत आहेत शुभेच्छांचा वर्षाव
हर्षच्या या पोस्टवर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळे शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 'बिग बॉस 15'चा स्पर्धक जय भानुशालीने लिहिले, "तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन." गायक राहुल वैद्य म्हणाला, "ओह माय गॉड, बाळाला पाहण्यासाठी आम्ही अजून प्रतिक्षा करु शकत नाही. अभिनंदन." तर उमर रियाझने लिहिले की, "शेवटी, तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन."

हर्ष एखाद्या नर्सप्रमाणे घेतो भारतीची काळजी
भारतीने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत हर्ष तिची काळजी कशी घेतो याचा खुलासा केला होता. याबद्दल बोलताना भारती म्हणाली होती, "हर्ष हा माझी एखाद्या नर्ससारखी काळजी घेतो. जेव्हा मला पाठदुखी होते तेव्हा तो पाणी गरम करून माझी पाठ शेकतो. रात्री जेव्हा मला काही खाण्याची इच्छा होते, तेव्हा तो फुड अ‍ॅप्सवर कोण होम डिलिव्हरी देऊ शकेल, याचा शोध घेतो. मला पनीर आणि दूध कधीच आवडले नाही, पण आता रात्री ते खावेसे वाटते."

7 वर्षे डेटिंग केल्यानंतर 2017 मध्ये दोघांनी थाटले लग्न
भारतीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबाचियाशी लग्न केले. भारती हर्षपेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. जवळपास 7 वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. हर्षने 'पीएम नरेंद्र मोदी बायोपिक'चे संवाद लिहिले आहेत. याशिवाय 'मलंग' चित्रपटाचा टायटल ट्रॅकही त्याने लिहिला होता.

बातम्या आणखी आहेत...