आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीचे उत्पन्न धोक्यात:सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्षाला 2 कोटी रुपये कमावते भारती, ड्रग्जच्या कबुलीजबाबामुळे होऊ शकते आता मोठे नुकसान

किरण जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारती कुरकुरे, टाइड, फ्लिपकार्ट, इनहेलर, ज्वेलरी अशा बर्‍याच ब्रँडशी जुळली आहे.

कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांचे ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर आता दोघांच्याही करिअरवर याचा कसा आणि किती परिणाम होणार यावरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. होस्टसह भारती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 3.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. ब्रँडेड कपड्यांपासून ते इनहेलर, कॉस्मेटिक ब्रँड्स, ऑनलाईन गेम अप्लिकेशन्सपर्यंत भारती अनेक ब्रँड प्रमोट करते, ज्यातून ती वार्षिक दोन कोटी रुपये कमवते.

जशी ब्रँडच्या पोस्टची डिमांड तशी भारतीची फी
भारतीचे निकटवर्तीय सांगतात, “सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यासाठी भारती एक लाख रुपये घेते. स्वाइप अप, सिंगल पिक्चर पोस्ट, व्हिडिओ, रील व्हिडिओ, ब्रँड अनाउंसमेंट, ब्रँड कर्टसी अशा वेगवेगळ्या पोस्ट ती करत असते. जशी ब्रँडच्या पोस्टची मागणी असेल तशी भारतीची फी असते. ती प्रमोशनसाठी 1 ते 5 लाख रुपयांपर्यंत मानधन घेते. असे काही ब्रॅण्ड देखील आहेत, जे प्रमोशनच्या मोबदल्यात आपले प्रॉडक्ट ती विनामूल्य देतात. भारतीकडे 15 - 18 ब्रँड आहेत ज्याचे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन करते आणि या सर्व ब्रॅण्डच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे दोन कोटी रुपये कमवते.''

वादात अडकल्याने नुकसान निश्चित
दिव्य मराठीशी झालेल्या संभाषणादरम्यान, पिक्चर अँड क्राफ्ट कंपनीचे प्रमुख पारुल चावला म्हणतात की, कंपनी गेल्या काही वर्षांपासून अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएंसरला हँडल करत आहे. तरुण पिढी या सेलिब्रिटींना त्यांचे आदर्श मानते. अशा परिस्थितीत जेव्हा हे सेलिब्रिटी अशा वादात अडकतात तेव्हा त्यांचे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता असते.

पारूल स्पष्ट करतात, "सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फॅन फॉलोइंगनुसार ब्रँड सेलिब्रिटींना साइन करते. अर्थात एखादी सेलिब्रिटी वादात अडकली तर ब्रॅण्ड त्याच्यासोबतचा करार संपुष्टात आणतात. कॉन्ट्रॅक्टमध्ये अशी अनेक कलमे असतात, त्यानुसार सेलिब्रिटीला अर्ध्यावरच ब्रॅण्ड प्रमोशनमधून बाहेर काढले जाते, की कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केला जात नाही.'

भारतीची फॅन फॉलोइंग कमी होणार नाही
दुसरीकडे, अ‍ॅड मेकर प्रह्लाद कक्कर यांच्या नुसार, देशातील अनेक तरुण कोणत्या ना कोणत्या प्रकारची नशा करतात. प्रह्लाद म्हणतात, "सत्य हे आहे की आपल्या देशातील 60 टक्के तरुण ड्रग्जचे व्यसन करतात, पण आपल्या सरकारला याची पर्वा नाही. फक्त ते लोक जे थोडेसे लोकप्रिय आहेत, त्यांच्याविरोधात सरकार आवाज उठवते."

प्रह्लाद पुढे म्हणतात - भारती देखील त्यापैकी एक आहे. तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये काही कमी होईल असे मला वाटत नाही. तसेच बर्‍याच ब्रँड कंपन्या या घाबरट असतात आणि म्हणूनच ते वादात सापडलेल्या सेलिब्रिटींची नावे आपल्या ब्रॅण्ड प्रमोशनमधून काढून टाकतात. भारती किंवा इतर ज्या सेलिब्रिटींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहे, त्यांना काही नुकसान होईल, असे मला वाटत नाही.” भारती कुरकुरे, टाइड, फ्लिपकार्ट, इनहेलर, ज्वेलरी अशा बर्‍याच ब्रँडशी जुळली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser