आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांनी गुरुवारी (3 डिसेंबर) रोजी आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने भारतीने हर्षसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करुन त्याच्यासाठी एक खास नोट लिहिली आहे. भारतीने तिच्या लग्नाचे काही अनसीन फोटो आणि प्री-वेडिंग फोटोशूटची झलक शेअर केली आहे.
भारतीने फोटो शेअर करुन लिहिले की, "तुम्ही किती दिवस, महिने किंवा किती वर्ष एकमेकांसोबत आहात यावर प्रेम अवलंबून नसते. तर एका दिवसात तुम्ही प्रेमाचा किती वर्षाव करता यावर खरे प्रेम ठरलेले असते", असे कॅप्शन भारतीने या फोटोला दिले आहे.
भारतीची ही पोस्ट पाहिल्यानंतर हर्षनेदेखील तिच्यासाठी अशाच आशयाची एक खास पोस्ट शेअर केली आहे. “एक चांगले लग्न म्हणजे आपल्याला सापडणारी वस्तू नसते, ते आपण बनवत असतो आणि ते आपल्याला टिकवून ठेवायचे असते. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भारती सिंह.''
ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर भारती आणि हर्ष पहिल्यांदा 2 डिसेंबर रोजी आदित्य नारायणच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दिसले होते. यावेळी दोघांनी डान्सही केला होता. त्यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांना त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, ट्रोलर्सकडे भारती आणि हर्ष दुर्लक्ष करताना दिसत आहे.
या दोघांनाही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) 21 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. वृत्तानुसार, एनसीबीने छापा टाकून त्यांच्या घरातून 86.50 ग्रॅम गांजा जप्त केला होता. यानंतर या दोघांनाही 15 हजारांच्या जातमुचलक्यावर दंडाधिकारी न्यायालयात जामीन मिळाला होता. सध्या हे दोघेही जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. एनसीबीने त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका विशेष एनडीपीसी कोर्टात दाखल केली असून त्यावर पुढी आठवड्यात सुनावणी आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.