- Marathi News
- Entertainment
- Tv
- Bharti Singh Harsh Limbachiyaa's 2BHK House Has Mini Bar To Work Area, See Inside Pictures Of The Couple's Creative Home
हाऊस टूर:भारती सिंग-हर्ष लिंबाचिया यांच्या 2BHK घरात मिनी बारपासून वर्क एरिया, बघा कपलच्या क्रिएटिव्ह होमचे इनसाइड फोटो
- पाहा घराची आतील छायाचित्रे-
लाफ्टर क्वीन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी अलीकडेच त्यांच्या यूट्यूब चॅनल LOL (Life of Limbachiyaa) वर त्यांच्या हाऊस टूरचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्लॉगमध्ये, कॉमेडियन भारतीय सिंग तिच्या 2 BHK घरात मजेदार पद्धतीने फेरफटका मारत आहे. या जोडप्याने त्यांचे घर खूप कलरफूल आणि सर्जनशील बनवले आहे. पाहा घराची आतील छायाचित्रे-
या जोडप्याने त्यांची लिव्हिंग रुम कमीत कमी फर्निचरसह बनवली आहे. यात पिवळ्या रंगाचा सिंगल सोफा आणि लाल काउच आहे. भारतीने व्लॉगमध्ये गमतीने सांगितले आहे की, पाहुण्यांनी घरात जास्त वेळ थांबू नये म्हणून तिने फक्त दोन सोफे ठेवले आहेत, जेणेकरून पाहुणे लवकर परत जातील. खोलीत वाइब्रेंट पडदे बसवले आहेत.
भारती आणि हर्ष यांनी वेल्वेट थीमवर बेडरूमची रचना केली आहे. या जोडप्याचा बेड वाईन कलरचा आहे.
या बेडरूममध्ये सिटिंग एरिया आणि टीव्हीची सुविधाही आहे. सिटिंग एरिया ग्रीन कलरच्या मखमली फॅब्रिकने बनलेला आहे.
या कपलने त्यांच्या बाल्कनीमध्ये सफेद आउटडोअर फर्निचर ठेवले आहे. येथे त्यांनी तुळशीचे छोटे रोप लावले असून चाहत्यांनी पाठवलेले गिफ्ट आहे. लाकडी फरशी असलेल्या या बाल्कनीतून मुंबईतील मोठ्या इमारतींचे दर्शन घडते.
कपलने डायनिंग एरिया लिव्हिंग रूमला जोडला आहे. येथे चार खुर्च्या आणि एक कॉमन सिटिंग असलेले पिवळ्या रंगाचा डायनिंग टेबल आहे.
या जोडप्याने त्यांच्या घराच्या एका कोपऱ्यात मिनी बार बनवला आहे. त्याच्या बाजूलाच भिंतीवर एक सुंदर पेंटिंग आहे.
भारतीने तिचे स्वयंपाकघर पांढ-या आणि काळ्या थीमवर बनवले आहे. कॉमेडियन तिचे स्वयंपाकघर अतिशय अरेंज करुन ठेवते. स्वयंपाकघरासोबत एक वॉशिंग एरिया जोडलेला आहे.
या घरातील एक रुम या कपलने वर्क रुम म्हणून सेट केली आहे. येथे iMac चा एक छोटासा सेटअप आहे जिथे हर्ष त्याचे काम करतो. या खोलीत प्रोजेक्टरची सुविधा देखील आहे जिथे हर्ष चित्रपट पाहतो. या खोलीत मनीष पॉल यांनी भेट दिलेल्या अनेक कुशन ठेवल्या आहेत.
या जोडप्याने आपल्या घराची एक भिंती क्रिएटिव्ह पेंटिंगने सजवली आहे. एका भिंतीला ब्रीक डिझाईन देऊन जोडप्याने त्यात चार पेंटिंग्ज लावल्या आहेत. त्यात ट्राय, होप, बिलीव्ह, ड्रीम असे लिहिले आहे.